बालभारती : दोन पदांवरील नियुक्त्यांबाबत ढिलाई काम करणारेही तेच, तपासणारेही तेच
By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:51+5:302015-08-20T22:09:51+5:30
--------पुणे: राज्य सरकारच्या बहुसंख्य खात्यांमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या दोन पदांवर केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त्या केल्या जातात. राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेत मात्र गेल्या वर्षभरापासून या दोन्ही पदांवर मंडळातीलच अधिकार्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
Next
---- ----पुणे: राज्य सरकारच्या बहुसंख्य खात्यांमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या दोन पदांवर केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त्या केल्या जातात. राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेत मात्र गेल्या वर्षभरापासून या दोन्ही पदांवर मंडळातीलच अधिकार्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.सरकारी आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त असावी, पारदर्शकता असावी या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारमध्ये ऑडिट जनरल हा स्वतंत्र विभाग आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये केंद्र किंवा राज्य सरकारच्या ऑडिट जनरल विभागांपैकी एकाकडून दरवर्षी लेखापरिक्षण होत असते. येणारे पैसे व जाणारे पैसे अशा दोन्ही स्तरावर या दोन पदांकडून परिक्षण केले जाते. त्यासाठी या दोन्ही पदांवरील नियुक्त्या या विभागाकडून केल्या जातात. केंद्र सरकारचे अधिकारी आहेत तिथे राज्य सरकारकडून परिक्षण होत नाही व राज्य सरकारचे आहेत तिथे केंद्राकडून नियुक्त्या होत नाहीत.बालभारती संस्थेकडून शालेय पाठ्यपुस्तकांची खरेदी व विक्री होत असल्यामुळे त्यांची वार्षिक उलाढाल जवळपास ५०० कोटी रूपयांची आहे. त्यामुळे बालभारतीमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी अशी दोन्ही पदे केंद्र सरकारकडून नियुक्त केली जातात. त्यापैकी अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या पदावर असलेले सुहास परळे जून २०१४ मध्ये निवृत्त झाले. वित्त व लेखाधिकारी असलेल्या सुहास कुलकर्णी यांची ऑगस्ट २०१४ मध्ये बदली झाली.त्यानंतर या दोन्ही पदांवर स्थानिक अधिकार्यांमधूनच नियुक्ती केली जात आहे. बालभारतीमध्ये मॅनेजर, स्टॉक ॲण्ड डिस्ट्रीब्यूटर्स या पदावर काम करणारे ए. डी. गायकवाड यांच्याकडे केंद्र सरकारच्या वित्त व लेखाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. बालभारतीत असिस्टंट फायनान्स ऑफिसर असलेल्या राजेंद्र पवार यांच्याकडे अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. गेल्या वर्षभरापासून हेच दोन अधिकारी केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त केल्या जाणार्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या मुळ पदाचे काम सांभाळून ते हा अतिरिक्त कार्यभारही पहात आहेत.यातील गंभीर बाब अशी आहे की गायकवाड व पवार यांच्याकडे बालभारतीमध्ये असलेल्या पदांवरून झालेले कामकाजच प्रामुख्याने केंद्र सरकारच्या पदांकडून तपासले जात असते. त्यामुळे त्यांच्या कामाचे तेच परिक्षण करीत आहे अशी स्थिती बालभारतीमध्ये गेले तब्बल वर्षभर आहे.जोड आहे,----------------------------