कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:20 PM2018-09-05T16:20:49+5:302018-09-05T16:21:03+5:30

ब्राह्मणगांव : येथे बुधवार बाजार चौकात कुपोषण निर्मूलना प्रमानेच पोषण आहार अभियान साठी पोषण महीना अभियान अन्तर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली. कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शनभरवले होते

 Pulses display | कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शन

कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देपोषण आहार बद्दल जन जागृति साठी विविध पालेभाज्या व फलानी सजवलेला रथ, तसेच घोष वाक्य लिहिलेली फलक हातात घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.


ब्राह्मणगांव : येथे बुधवार बाजार चौकात कुपोषण निर्मूलना प्रमानेच पोषण आहार अभियान साठी पोषण महीना अभियान अन्तर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली. कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शनभरवले होते
आंगनवाडी सेविका, मदतनिस , आशा कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या , विविध प्रकारची कडधन्ये , विविध प्रकारचे शरीरास पोषक असे तयार खाद्य पदार्थ यांचे प्रदर्शन भरवले होते त्यांचे उद्घाटन  उपसरपंच आककबाई खरे , यू . बी. निकम ,तसेच माधुरी अहिरे यांचे हस्ते करण्यात आले .
पोषण आहार बद्दल जन जागृति साठी विविध पालेभाज्या व फलानी सजवलेला रथ, तसेच घोष वाक्य लिहिलेली फलक हातात घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक , ग्रामपंचयत सदस्य , ग्रामस्थ े सहभागी झाले होते. जन जागृती फेरी नंतर विशेष ग्राम सभा सम्पन्न झाली . ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी पी. के. बागुल यानी पोषण आहार अभियानाची माहिती देत प्रत्येक कुटुंबत गरोदर महिलांची काळजी , प्रसूति नंतर बालकाला तत्काल व सहा महिन्या पर्यंत निव्वळ स्तनपान , वयाच्या सहा महीने पूर्ण झालेल्या बालकाला वरचा आहार , बालक महिला व मूली मधील रक्ताची अल्पता , , मुलींचे शिक्षण , पोषण आहार व विवाह योग्य वय , वैयिक्तक स्वछता व परिसर स्वच्छता , आरोग्यदायी व सूक्षम पोषण मूल्य असलेल्या आहराचे सेवन या विषयावर मार्गदर्शन केले.

Web Title:  Pulses display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.