मुंबई, आशिया चषक २०१८: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट मैदानावर महायुद्ध होणार आहे. हे शेजारी जेव्हा क्रिकेट मैदानावर एकमेकांविरुद्ध उतरता तेव्हा दोन्ही देशांतील जनतेच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. उभय देशांतील प्रत्येक सामना हा हाय व्होल्टेजचाच असल्याने सामन्यात टाकला जाणारा एकही चेंडू चुकवण्याची कोणाची इच्छा नसते. सामान्य क्रिकेट चाहतेच नव्हे, तर अन्य खेळातील दिग्गजांनाही या लढतीची प्रतिक्षा आहे. यात विश्वविजेती बॉक्सर एमसी मेरी कोमचाही समावेश आहे.
मेरी कोमने नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या पदकांत भर घातली. पोलंड येथील सिलेसियन खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत मेरीने ४८ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तिने चार तासात दोन किलो वजन कमी करण्याची अशक्य गोष्ट करून दाखवत हे पदक जिंकले. मेरीने आतापर्यंत पाचवेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. दुखापतीमुळे मेरीला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. पण ती कसर मेरीने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भरून काढली.
बॉक्सिंग स्पर्धा संपवून मायदेशात परतल्यावर मेरीने भारत आणि पाकिस्तान यांची लढत पाहण्यासाठी आपणही उत्सुक असल्याचे सांगितले. तिने असे ट्विटही केले. सोबत या लढतीसाठी तिने स्वतःचा फेव्हरिट संघही निवडला. मेरीला तिच्या संघात कोण कोण असेल असे विचारण्यात आलेही, परंतु तिने ते गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले.
Web Title: Asia Cup 2018: World champion Mary Kom Curious about India-Pakistan match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.