हिटमॅन रोहित शर्माच्या या इंटरेस्टिंग गोष्टी माहीत आहेत?

रोहितच्या नावावर आज 180 वनडे सामन्यात 34 अर्धशकतं आणि 17 शकतं आहेत. तर टेस्टमध्ये त्याने 9 अर्धशकतं आणि तीन शतकं लगावली आहे. चला जाणून घेऊया रोहित शर्माच्या अशाच काही खास गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 11:27 AM2018-04-30T11:27:46+5:302018-04-30T11:27:46+5:30

whatsapp join usJoin us
Birthday Special : Indian cricketer Rohit Sharma 10 interesting facts | हिटमॅन रोहित शर्माच्या या इंटरेस्टिंग गोष्टी माहीत आहेत?

हिटमॅन रोहित शर्माच्या या इंटरेस्टिंग गोष्टी माहीत आहेत?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : टीम इंडियाचा उपकर्णघार आणि हिटमॅन या नावाने प्रसिद्ध असलेला रोहित शर्माचा आज वाढदिवस. 30 एप्रिल 1987 मध्ये त्याचा जन्म नागपूरमध्ये झाला होता. मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यू करणाऱ्या रोहितने त्याचा पहिला इंटरनॅशनल सामना 2007 मध्ये खेळला होता. रोहितच्या नावावर आज 180 वनडे सामन्यात 34 अर्धशतकं आणि 17 शतकं आहेत. तर टेस्टमध्ये त्याने 9 अर्धशतकं आणि तीन शतकं लगावली आहे. चला जाणून घेऊया रोहित शर्माच्या अशाच काही खास गोष्टी...

1) टीम इंडियासाठी खेळण्याआधी रोहित शर्मा इंडियन ऑईलसाठी केळला आहे. मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर त्याला टीम इंडियाच्या 11 खेळाडूंमध्ये संधी मिळाली आहे.

2) आयसीसी वर्ल्ड कपच्या इतिहासात सौरव गांगुलीनंतर रोहित शर्मा दुसरा भारतीय खेळाडू आहे ज्याने नॉकआऊट सामन्यात शतक लगावलं आहे.

3) रोहित शर्मा भारतातील टी-20 सामन्यात शतक लगावणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. त्याने सईद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये गुजरात विरुध्द 45 बॉल्समध्ये नाबाद 101 रन्सची खेळी केली होती.

4) रोहित शर्मा वनडे सामन्यात तीनदा डबल शतक लगावणारा जगातला पहिला खेळाडू आहे. 

5) आयपीएलचे चार फायनल खेळणारा रोहित शर्मा हा एकुलता एक खेळाडू आहे. महत्वाची बाब म्हणजे प्रत्येकवेळी त्याला विजय मिळाला आहे. 

6)  रोहित शर्मा हा क्रिकेटच्या सर्वच फॉर्ममध्ये शतक लगावणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. हा मान मिळवणारा पहिला खेळाडू हा सुरेश रैना हा आहे. 

7) रोहित शर्माने हॅट्रिक लगावण्याचीही कमाल केली आहे. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळत मुंबई इंडियन्स विरोधात रोहितने ही कमाल केली होती. 

8) वनडेच्या एका खेळीत सर्वात जास्त फोर लगावण्याचा रेकॉर्डही रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने 2014 मध्ये श्रीलंके विरुध्द कोलकातामध्ये 264 रन्सच्या खेळीदरम्यान 33 फोर लगावले होते. 

9) रोहित शर्माने पहिल्या टेस्ट सामन्यात 177 आणि दुसऱ्या टेस्टमध्ये 111 रन्सची नाबाद खेळी केली होती. डेब्यू केल्यानंतर लागोपाठ दोन टेस्टमध्ये शतक लगावणारा तो तिसरा खेळाडू आहे. त्याच्याआधी हे सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी हा कारनामा केला होता. 

10) रोहित शर्माला 2015 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Birthday Special : Indian cricketer Rohit Sharma 10 interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.