लंडन : अष्टपैलू ख्रिस व्होक्सच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात दिवसाअखेर ६ बाद ३५७ धावा केल्या आणि कसोटीवर मजबूत पकड मिळवली. पहिल्या दिवसाचा खेळ उजेड कमी असल्याने थांबविण्यात आला; मात्र तोपर्यंत इंग्लंडने २५० धावांची आघाडी मिळवली होती.
दुसरा दिवस इंग्लंडच्या गोलंदाजांनी गाजवल्यावर, तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीय गोलंदाजांनी चांगली केली. उपाहारापर्यंत इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले; मात्र मोहम्मद शमी याने इंग्लंडची आघाडीची फळी तंबूत पाठवल्यावर जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस व्होक्स या मधल्या फळीतील फलंदाजांनी इंग्लंडची पडझड रोखली आणि डाव सावरला. लॉर्ड्सवर तिसºया दिवसाची सुरुवात भारतासाठी अनुरूप होती. सलामीवीर के. के. जेनिंग्ज याला मोहम्मद शमी याने सातव्या षटकांतच पायचीत पकडले. यावर जेनिंग्ज याने डीआरएसचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय अपयशी ठरला.
त्यानंतर पुढच्याच षटकात इशांत शर्माने कुकला तंबूत पाठवले. दोन्ही सलामीवीर ३२ धावांतच माघारी परतल्यावर कर्णधार जो रुट याने ओली पोप या नवख्या फलंदाजाच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अननुभवी पोपला पांड्याने पायचीत केले. त्या वेळी इंग्लंडची धावसंख्या ७७ होती. त्यानंतर मोहम्मद शमीचा स्पेल भारतासाठी सर्वात चांगला ठरला. त्याने जो रुट (१९) आणि जोश बटलर यांना पायचीत पकडत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले. उपाहारापर्यंत चार बाद ८९ वर असेलल्या इंग्लंडने उपहारानंतर काही वेळातच पाचवा गडी गमावला.
आता डावावर भारताचे निर्माण झालेले वर्चस्व मोडून काढत इंग्लंडच्या बेअरस्टो आणि ख्रिस व्होक्स यांनी डाव सावरला. त्यांनी १८९ धावांची भागीदारी केली.
जॉनी बेअरस्टो याने १४४ चेंडूंचा सामना करताना ९३ धावा, तर व्होक्स याने १५९ चेंडूंत नाबाद १२० धावा केल्या. व्होक्स याने योग्य वेळी भारतीय गोलंदाजीवर आक्रमण केले. त्यामुळे इंग्लिश फलंदाजीवरचे दडपण कमी झाले. अखेरीस हार्दिक पांड्या याने बेअरस्टोला कार्तिक करवी बाद करत संघाला दिलासा मिळवून दिला.
शमीने इंग्लंडची आघाडी फळी तंबूत पाठवल्यानंतर निर्माण झालेला तणाव बेअरस्टो आणि व्होक्स यांनी सहज हाताळला. दोघांनीही फटकेबाजी करत संघाच्या डावाला आकार दिला. ही भागीदारी जशजशी वाढत गेली. तसतसा सामना भारताच्या हातून निघत गेला. दिवसाचा खेळ संपला, तेव्हा व्होक्स १२० धावांवर, तर सॅम क्युरान २२ धावांवर खेळत होता.
दिवसाच्या पहिल्या सत्रात आर. आश्विनला गोलंदाजी न देण्याचा कर्णधार कोहलीचा निर्णय आश्चर्यकारक ठरला. भारताचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या मोहम्मद शमी याने १६ षटकांत ६७ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. तर हार्दिक पांड्याने ६६ धावात दोन गडी बाद केले. इशांत शर्मा यानेही एक बळी मिळवला. लॉर्ड्सवर संधी देण्यात आलेल्या कुलदीपला अजून एकही बळी मिळालेला नाही.
धावफलक
भारत पहिला डाव सर्वबाद १०७.
इंग्लंड ८१ षटकांत ६ बाद ३५७.
अॅलेस्टर कुक झे. कार्तिक गो. शर्मा २१, के.के. जेनिंग्ज पायचीत मोहम्मद शमी ११, जो रुट पायचीत मोहम्मद शमी १९, ओली पोप पायचीत पांड्या २८, जॉनी बेअरस्टो ९३, जोश बटलर पायचीत मोहम्मद शमी २४, ख्रिस व्होक्स खेळत आहे १२०, सॅम क्युरान खेळत आहे २२ ; अवांतर; १९ गोलंदाजी : इशांत शर्मा १९-३-८८-१, मोहम्मद शमी १९-४-७४-३, कुलदीप यादव ९-१-४४-०, हार्दिक पांड्या १७-०-६६-२, अश्विन १७-१-६८-०.
Web Title: Chris Woakes's century, England strong grip on Lord's Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.