नवी दिल्ली : प्रशासकांच्या समितीची (सीओए) बुधवारी बीसीसीआयच्या सीनिअर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. बैठकीत अजेंड्यावर पॅरिसमध्ये २०२४ मध्ये होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेतील सहभागाबाबत बीसीसीआयचा दृष्टिकोन, आॅडिट फर्म डेलोइटच्या आर्थिक अनियमिततेबाबत चर्चा व स्थानिक क्रिकेटमधील मानधनाचा मुद्दा हे विषय असतील.
पॅरिसमध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये क्रिकेटचा एक खेळ म्हणून समावेश असण्याची शक्यता आहे. दर चार वर्षांनी होणाºया या प्रतिष्ठेच्या क्रीडा महाकुंभामध्ये सहभाग नोंदविण्याबाबत बीसीसीआय विशेष उत्सुक नाही. त्यामुळे या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार आहे.
एकूण नऊ मुद्यांवर सीओए बीसीसीआयसोबत चर्चा करणार आहे. त्यात सर्व वयोगटातील स्थानिक क्रिकेटपटूंसह सामनाधिकाºयांच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. स्थानिक क्रिकेटमधील वेतनाबाबत २००७ नंतर निर्णय घेण्यात आलेला नाही. खेळाडूंना प्रथमश्रेणी सामन्यासाठी प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये मिळतात. याव्यतिरिक्त मोसमाच्या शेवटी त्यांना प्रसारण अधिकारातून एकमुश्त रक्कम मिळते.
सीओए अंकेक्षण अहवाल तयार करणाऱ्या डेलोइटच्या याबाबतच्या प्रस्तुतीवर चर्चा करणार आहेत. माजी सीओए सदस्य रामचंद्र गुहा यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता आणि कोण समालोचन करणार आणि कोण करणार नाही, हे आता खेळाडू ठरविणार का, असा प्रश्न केला होता.
त्याचप्रमाणे कोलकाता येथे अलीकडेच झालेला दौरा व कार्यक्रम समिती आणि तांत्रिक समितीच्या निर्णयांची सीओए सदस्यांना माहिती देण्यात येईल. भविष्यात होणाºया इंडियन प्रीमिअर लीगबाबतही चर्चा होणार आहे. (वृत्तसंस्था)
दुहेरी लाभाबाबत चर्चा
दुहेरी लाभाच्या पदाबाबतही चर्चा होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत दुहेरी लाभाच्या पदाचा मुद्दा उपस्थित केला आहे. अन्य एक मुद्दा म्हणजे समालोचकांची यादी तयार करण्याबाबत राहील. बीसीसीआयला आगामी सत्रासाठी समालोचकांची यादी निश्चित करावी लागणार आहे. प्रसिद्ध समालोचक हर्ष भोगले यांचे पुनरागमन होते किंवा नाही, याबाबत उत्सुकता राहील. कारण बीसीसीआयने खेळाडूंवर टीका करण्याप्रकरणी भोगले यांना बाहेर केले होते.
Web Title: Coach meeting today, discuss with BCCI officials
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.