कराची : क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाकिस्तानच्या एका उदयोन्मुख खेळाडूचा डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने मृत्यू झाला. झुबेर अहमद असे या खेळाडूचे नाव आहे.
पाकिस्तानच्या फखर जमान अकादमीचा तो सदस्य होता. १४ आॅगस्ट म्हणजेच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एका क्लब मॅचदरम्यान ही घटना घडली. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या उसळीबाबत योग्य अंदाज न आल्याने तो चेंडू थेट त्याच्या डोक्यावर जाऊन आदळला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. फलंदाजी करताना झुबेरने हेल्मेट घातले नव्हते अशी माहिती समोर आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोडार्ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. झुबेर अहमदचा मृत्यू दु:खद आहे. खेळताना नेहमी हेल्मेट वापरावं आणि सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यायला हवी हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं पीसीबीने ट्विट करून म्हटलं आहे.
याशिवाय दोन दिवसांपूर्वीच आॅस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर थोडक्यात बचावला. जोश हेजलवूडच्या एका खतरनाक बाऊन्सरवर तो जखमी झाला. सराव सामन्यादरम्यान ही घटना घडली. हेजलवूडच्या बाऊन्सरवर वॉर्नरने जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न केला; पण चेंडूच्या उसळीचा त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू थेट त्याच्या मानेवर जाऊन आदळला आणि वॉर्नर खाली कोसळला.
Web Title: Cricketer dies after bouncer on head
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.