ठळक मुद्देगिलने 36 चेंडूंत 6 चैकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 57 धावा केल्या. कार्तिकनेही 18 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 45 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
चेन्नईने अव्वल स्थान गमावले, कोलकात्याचा सहा विकेट्स राखून विजय
कोलकाता : शुभमन गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या पराभवामुळे चेन्नईला अव्वल स्थान गमवावे लागले आहे, तर कोलकात्याचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कोलकात्यापुढे 178 धावांचे आव्हान ठेवले होते. धोनीने 25 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 43 धावा फटकावत संघाला सन्मानकारक धावसंख्या उभारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या कोलकात्या सुनील नरिनला रवींद्र जडेजाने सलग दोन चेंडूवर झेल सोडत जीवदान दिले. नरिनने नरिनने 20 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 32 धावा केल्या. त्यानंतर मात्र गिलने संघाने आपल्यावर दाखवलेला विश्वास फटकेबाजीच्या जोरावर सार्थकी लावला. गिलने 36 चेंडूंत 6 चैकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 57 धावा केल्या. कार्तिकनेही 18 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 45 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या दोघांनी पाचव्या विकटेसाठी अभेद्य 83 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
11.24 PM : कोलकात्याचा चेन्नईवर सहा विकेट्स राखून विजय
11.20 PM : कोलकाता विजयासमीप 18 चेंडूंत 13 धावांची गरज
11.19 PM : कोलकाता विजयासमीप 20 चेंडूंत 16 धावांची गरज
11.11 PM : शुभमन गिलचे 32 चेंडूंत अर्धशतक
- कोलकात्याचा युवा फलंदाज शुभमन गिलने 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधले त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले.
11.07 PM : कोलकाता पंधरा षटकांत 4 बाद 141
11.05 PM : शुभमन गिलचे पंधराव्या षटकात दोन षटकार
- आसिफच्या पंधराव्या षटकात गिलने दोन षटकार लगावत कोलकात्याला विजयाची आशा दाखवली.
10.52 PM : दिनेश कार्तिकने चौकारासह उघडले खाते
- कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने दुसऱ्याच चेंडूवर चौकार लगावत झोकात सुरुवात केली.
10.49 PM : रींकू सिंग बाद; कोलकात्याला चौथा धक्का
- हरभजन सिंगने बाराव्या षटकात रींकू सिंगला त्रिफळाचीत केले. कोलकात्यासाठी हा चौथा धक्का होता. रींकूने 16 धावा केल्या.
10.42 PM : कोलकाता 10 षटकांत 3 बाद 90
10.31 PM : सुनील नरिन बाद; कोलकात्याला तिसरा धक्का
- रवींद्र जडेजाने सातव्या षटकात नरिनला बाद करत कोलकात्याला तिसरा धक्का दिला. नरिनने 20 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 32 धावा केल्या.
- 10.20 PM : रॉबिन उथप्पा बाद; कोलकात्याला दुसरा धक्का
- केएम आसिफने पाचव्या षटकात रॉबिन उथप्पाला बाद करत कोलकात्याला दुसरा धक्का दिला.
10.05 PM : सुनील नरिनला सहा धावांवर असताना जीवदान
10.00 PM : कोलकात्याला पहिल्याच षटकात धक्का; ख्रिस लिन बाद
- चेन्नईच्या लुंगी एनिगडीने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ख्रिस लिनला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला.
धोनी पुन्हा एकदा तळपला, चेन्नईच्या 177 धावा
कोलकाता : कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केलेल्या धडाकेबाज फटकेबाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 178 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. चेन्नईच्या शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी 48 धावांची सलामी दिली. ड्यू प्लेसिसपेक्षा वॉटसन यावेळी आक्रमक खेळत होता. वॉटसनने 25 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 36 धावा केल्या. पण वॉटसन आणि रैना बाद झाल्यावर धोनीने संघाची धुरा सांभळली. धोनीने 25 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 43 धावा फटकावल्या.
9.40 PM : चेन्नईचे कोलकात्यापुढे 178 धावांचे आव्हान
9.39 PM : चेन्नईला पाचवा धक्का; जडेजा बाद
9.30 PM : धोनीला 29 धावांवर असताना जीवदान
- अठराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शुभमन गिलने सीमारेषेवर धोनीचा झेल सोडला. धोनी तेव्हा 29 धावांवर होता.
... अन सामन्यादरम्यान त्या तरुणाने धोनीचे पाय पकडले
9.13 PM : चेन्नईला चौथा धक्का; रायुडू बाद
- सुनील नरिनने रायुडूला त्रिफळाचीत करत चेन्नईला चौथा धक्का दिला. रायुडूने तीन चौकारांच्या जोरावर 21 धावा केल्या.
9.03 PM : चेन्नई 13 षटकांत 3 बाद 110
8.56 PM : चेन्नईला तिसरा धक्का; रैना बाद
- कुलदीप यादवने सुरेश रैनाला मिचेल जॉन्सनकरवी झेलबाद केले. चेन्नईसाठी हा तिसरा धक्का होता.
8.53 PM : चेन्नईला दुसरा धक्का; वॉटसन बाद
- सुनील नरिनने वॉटसनला बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. वॉटसनने 25 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 36 धावा केल्या.
8.33 PM : चेन्नई सात षटकांत 1 बाद 69
8.22 PM : चेन्नईला पहिला धक्का; ड्यू प्लेसिस बाद
- पीयुष चावलाने सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फॅफ ड्यू प्लेसिसला त्रिफळाचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. ड्यू प्लेसिस 15 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 27 धावा फटकावल्या.
8.17 PM : जॉन्सनला चेंडू लागूनही वॉटसनचा चौकार
- मिचेन जॉन्सनच्या पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शेन वॉटसनने जोरदार फटका लगावला. हा फटका जॉन्सनच्या हाताला लागला. पण वॉटसनने हा फटका एवढा जोरात मारला होता की चेंडू थेट सीमारेषे पार जाऊनच थांबला.
8.10 PM : चेन्नई 3 षटकांत 24 धावा, वॉटसन आणि ड्यू प्लेसिस यांचे पाच चौकार
महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीचा अंदाज कसा घेतो ते पाहा...
7.30 PM : कोलकात्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली
दोन यष्टीरक्षकांच्या नेतृत्वाची कसोटी; चेन्नई-कोलकाता यांच्यात आज लढत
कोलकाता : महेंद्रसिंग धोनी आणि दिनश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षकांच्या नेतृत्वाची कसोटी आज लागणार आहे. कारण चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चेन्नईच्या संघाने दमदार कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, त्यामुळे या विजयासह ते आपले अव्वल स्थान कायम राखतात हा, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. आयपीएलच्या बाद फेरीचे वेध आता साऱ्याचा संघांना लागलेले आहेत. त्यामुळे चेन्नईवर विजय मिळवून कोलकात्याचा संघ बाद फेरीच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करेल.
दोन्ही संघ
Web Title: CSK vs KKR, IPL 2018 LIVE: LOOK... Mahendra Singh Dhoni HOW STUDY pitch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.