ठळक मुद्देहेजलवूडच्या बाऊन्सरवर वॉर्नरने जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न केला पण चेंडूच्या उसळीचा त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू थेट त्याच्या मानेवर जाऊन आदळला आणि वॉर्नर खाली कोसळला.त्यावेळी स्लीपमध्ये उभा असलेला स्टिव्ह स्मिथ मदतीसाठी धावला आणि डॉक्टरही मैदानात पोहोचले. त्यानंतर 30 वर्षाच्या वॉर्नरला मैदान सोडावं लागलं. पुन्हा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. पण सुदैवानं वॉर्नरची दुखापत गंभीर नसल्याची माहिती आहे.
सिडनी, दि. 16 - ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर थोडक्यात बचावला आहे. जोश हेजलवूडच्या एका खतरनाक बाऊन्सरवर तो जखमी झाला आहे. सराव सामन्यादरम्यान ही घटना घडली.
हेजलवूडच्या बाऊन्सरवर वॉर्नरने जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न केला पण चेंडूच्या उसळीचा त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू थेट त्याच्या मानेवर जाऊन आदळला आणि वॉर्नर खाली कोसळला. त्यावेळी स्लीपमध्ये उभा असलेला स्टिव्ह स्मिथ मदतीसाठी धावला आणि डॉक्टरही मैदानात पोहोचले. त्यानंतर 30 वर्षाच्या वॉर्नरला मैदान सोडावं लागलं. पुन्हा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. पण सुदैवानं वॉर्नरची दुखापत गंभीर नसल्याची माहिती आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशच्या दौ-यावर जाणार आहे. या दौ-यासाठीची तयारी म्हणून स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या संघांमध्ये सराव सामना सुरू होता. शुक्रवारी कांगारूंचा संघ बांगलादेश दौ-यासाठी रवाना होणार आहे. ढाकामध्ये 27 ऑगस्ट रोजी दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. दरम्यान गंभीर दुखापत नसल्यामुळे वॉर्नर या दौ-यावर जाणार असल्याची माहिती आहे. फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर त्याला दौ-यावर जाण्याची परवानगी मिळाली आहे.
क्रिकेटच्या मैदानावर अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2014 साली देशांतर्गत सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा फलंदाजीदरम्यान डोक्यावर चेंडू आदळल्याने मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संपूर्ण क्रिकेटविश्व दु:खाच्या सागरात बुडालं होतं. वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट याचा उसळता चेंडू हूक करण्याच्या नादात डोक्याच्या मागील भागावर आदळला होता. या घटनेनंतर त्याला तातडीच्या प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिडनी हॉस्पिटलमध्ये त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतरही तो कोमामध्येच होता, अखेर त्याचा मृत्यू झाला.
याशिवाय दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर थोडक्यात बचावला. जोश हेजलवूडच्या एका खतरनाक बाऊन्सरवर तो जखमी झाला. सराव सामन्यादरम्यान ही घटना घडली. हेजलवूडच्या बाऊन्सरवर वॉर्नरने जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न केला पण चेंडूच्या उसळीचा त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू थेट त्याच्या मानेवर जाऊन आदळला आणि वॉर्नर खाली कोसळला.
यापूर्वीच्या दुर्दैवी घटना
-1998 मध्ये भारताचा क्रिकेटपटू रमण लांबा शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू कानावर लागल्याने जखमी. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू
-1958-59 मध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक अब्दुल अझीज याला स्थानिक स्पर्धेत चेंडू छातीवर लागला. जागीच बेशुद्ध पडलेला अझीजचा रुग्णालयात जात असतानाच मृत्यू
-1961-62 मध्ये भारताच्या नरी कॉण्ट्रॅक्टर यांना विंडीजच्या ग्रिपिथचा चेंडू डोक्याला लागला होता. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने कॉण्ट्रॅक्टर यांचा जीव वाचला, पण पुन्हा क्रिकेट खेळू शकले नाहीत.
-2012 मध्ये सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक मार्क बाऊचर याच्या डोळ्याला इजा. त्यानंतर त्याची क्रिकेटमधून निवृत्ती.
-2012 मध्ये झुल्फिकार भट्टी या पाकिस्तानी क्रिकेटपटूचा स्थानिक सामन्यात जिना स्टेडियमवर उसळता चेंडू छातीत लागला आणि त्याचा पिचवर मृत्यू झाला.
-2013 मध्ये डेर्रीन रंडल दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा उसळणारा चेंडू डोक्यावर लागून मृत्यू झाला.
आणखी वाचा - (...तर ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळणार नाही, डेव्हिड वॉर्नर संतापला)
पाहा व्हिडिओ :
Web Title: David Warner hit by a bouncer retires hurt
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.