ठळक मुद्देगंभीरला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळवणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
रोमहर्षक लढतीत दिल्लीची राजस्थानवर चार धावांनी मात
नवी दिल्ली : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने राजस्थान रॉयल्सवर चार धावांनी विजय मिळवला. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या युवा फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत 17.1 षटकांमध्ये 6 बाद 196 धावा फटकावल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे राजस्थानला विजयासाठी 12 षटकांत 151 धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानच्या जोस बटलरने तुफानी फलंदाजी करत 26 चेंडूंत 4 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 67 धावांची तुफानी खेळी सााकारली. त्यामुळे राजस्थान विजय मिळवेल असे वाटत होते. पण बटलर बाद झाल्यावर राजस्थानची विजयावरची पकड ढिली झाली. त्यानंतर अन्य फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते, पण अखेर त्यांना चार धावांनी पराभव पत्करावा लागला.
12.34 PM : राजस्थानला सहावा धक्का; राहुल त्रिपाठी बाद
12.28 PM : राजस्थानला विजयासाठी 6 चेंडूंत 15 धावांची गरज
12.22 PM : राजस्थानला विजयासाठी 12 चेंडूंत 30 धावांची गरज
12.20 PM : डी'शॉर्ट बाद; राजस्थानला चौथा धक्का
- सलग तीन षटकार लगावल्यावर ग्लेन मॅक्सवेलने डी'शॉर्ट बाद करत राजस्थानला चौथा धक्का दिला. डी'शॉर्टने 25 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या.
12.16 PM : राजस्थानला तिसरा धक्का; बेन स्टोक्स बाद
- नवव्या षटकातच ट्रेंट बोल्टने स्टोक्सला बाद करत दिल्लीला तिसरा धक्का दिला.
12.14 PM : राजस्थानला दुसरा धक्का; संजू सॅमसन बाद
- नवव्या षटकात ट्रेंट बोल्टने सॅमसनला बाद करत राजस्थानला दुसरा धक्का दिला.
12.00 PM : जोस बटलर OUT; राजस्थानला मोठा धक्का
- अमित मिश्राने बटलरला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. बटलरने 26 चेंडूंत 4 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 67 धावांची तुफानी खेळी सााकारली.
11.51 PM : जोस बटलरच्या 18 चेंडूंत 54 धावा
- बटलर नावाचं वादळ दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानात आलं आणि त्यापुढे दिल्लीचे गोलंदाज नतमस्तक झाले. 18 चेंडूंत 54 धावा करताना बटलरने तीन चौकार आणि सहा षटकार फटकावले.
11.49 PM : चार षटकांमध्ये राजस्थान बिनबाद 58
11.48 PM : चौथ्याच षटकात राजस्थानचे अर्धशतक पूर्ण
11.41 PM : जोस बटलरचे सलग दोन षटकार
- अव्हेश खानच्या तिसऱ्या षटकात बटलरने तब्बल 23 धावा लूटल्या.
11.35 PM : राजस्थानची पहिल्या षटकात फटकेबजी; 14 धावा लूटल्या
दिल्लीचा तुफानी फटकेबाजी; राजस्थानपुढे 12 षटकांत 151 धावांचे आव्हान
नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या युवा फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत 17.1 षटकांमध्ये 6 बाद 196 धावा फटकावल्या. पृथ्वी शॉ याने संघाला धडाक्यात सुरुवात करून दिली, पण त्याचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. पृथ्वीने 25 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या जोरावर 47 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पृथ्वीनंतर श्रेयस अय्यर आणि रीषभ पंत यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. श्रेयसने 35 चेंडूंत प्रत्येकी तीन चौकार आणि षटकार लगावत 50 धावा केल्या. श्रेयसपेक्षा पंत यावेळी जास्त आक्रमक खेळला. पंतने 29 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 69 धावांची तुफानी खेळी साकारली.
10.57 PM : पावसामुळे सामन्यात पुन्हा व्यत्यय; दिल्ली 6 बाद 196
10.55 PM : दिल्लीला सहावा धक्का; ग्लेन मॅक्सवेल बाद
- जेफ्रो आर्चरने ग्लेन मॅक्सवेलला बाद करत दिल्लीला सहावा धक्का दिला.
10.50 PM : दिल्लीला पाचवा धक्का; विजय शंकर बाद
- जयदेव उनाडकटने सतराव्या षटकात शंकरला बाद करत दिल्लीला पाचवा धक्का दिला. शंकरने 17 धावा केल्या.
10.44 PM : रीषभ पंत बाद; दिल्लीचा चौथा धक्का
- श्रेयस बाद झाल्यावर रीषभही लवकर बाद झाला. दिल्लीसाठी हा चौथा धक्का होता. पंतने 29 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 69 धावांची तुफानी खेळी साकारली.
10.40 PM : अर्धशतक झळकावून श्रेयस अय्यर बाद
- अर्धशतक झळकावल्यावर श्रेयस लगेगच बाद झाला आणि दिल्लीला तिसरा धक्का बसला. श्रेयसने 35 चेंडूंत प्रत्येकी तीन चौकार आणि षटकार लगावत 50 धावा केल्या.
10.25 PM : चौदाव्या षटकात दिल्लीच्या दिडशे धावा पूर्ण
- श्रेयस अय्यर आणइ रीषभ पंत यांनी राजस्थानच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केला आणि दिल्लीला चौदाव्या षटकात दीडशे धावांपर्यंत मजल मारून दिली.
10.15 PM : दिल्लीचे अकराव्या षटकात शतक पूर्ण
10.01 PM : पृथ्वी शॉचे अर्धशतक तीन धावांनी हुकले; दिल्लीला दुसरा धक्का
- राजस्थानच्या श्रेयस गोपालने आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वीला बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. पृथ्वीने 25 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या जोरावर 47 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
9.56 PM : श्रेयस अय्यरचे सहाव्या षटकात सलग दोन षटकार
- सहाव्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर श्रेयसने दोन षटकार लगावत दिल्लीच्या गोलंदाजीतली हवा काढून टाकली.
9.50 PM : पाच षटकांत दिल्ली 1 बाद 48
- पृथ्वी आणि श्रेयस या दोन्ही मुंबईकरांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दिल्लीला पाच षटकांत 48 धावांपर्यंत मजल मारून दिली.
9.49 PM : पृथ्वी शॉचे सलग दोन चौकार
9.41 PM : पृथ्वी शॉ याला 18 धावांवर जीवदान
- धवल कुलकर्णीने तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर स्वत:च्या गोलंदाजीवर पृथ्वीचा झेल सोडला. त्यावेळी पृथ्वी 18 धावांवर होता.
9.40 PM : पृथ्वी शॉ याचा तिसऱ्या षटकात दुसरा षटकार
- धवल कुलकर्णीच्या तिसऱ्या षटकात पृथ्वीने दोन षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. या षटकात पृथ्वीने 16 धावा लूटल्या.
9.37 PM : श्रेयस अय्यरचा दिल्लीसाठी पहिला चौकार
- जेफ्रो आर्चरच्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर श्रेयसने दिल्लीसाठी पहिला चौकार लगावला.
9.33 PM : दिल्लीला पहिला धक्का; कॉलिन मुर्नो शून्यावर बाद
- धवल कुलकर्णीने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दिल्लीचा सलामावीर कॉलिन मुर्नो शून्यावर बाद केले.
.28 PM : पृथ्वी शॉ पहिल्याच चेंडूचा सामना करायला सज्ज
9.24 PM : दिल्ली आणि राजस्थानचा सामना 18 षटकांचा खेळवणार
8.57 PM : पाहा... राजस्थानच्या खेळाडूंची बॉटल चॅलेंज स्पर्धा
8.55 PM : पाऊस थांबला; काहीच वेळात पंच करणार मैदानाची पाहणी
8.00PM : पावसामुळे राजस्थान-दिल्ली सामना उशिराने सुरु होणार
- फिरोझशाह कोटलावर पावसाच्या सरी कोसळत असून, पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर होणार आहे.
7.45 PM : सलग तिसऱ्या सामन्यात गौतम गंभीर संघाबाहेर
7.34 PM : राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजासाठी पाचारण केले.
रिकी पाॅन्टिंगची पृथ्वी शॉला शिकवणी
दोन मुंबईकर कर्णधारांमध्ये विजयासाठी चुरस; दिल्ली आणि राजस्थान यांच्यात सामना
नवी दिल्ली : अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोन मुंबईकर आज एकमेकांपुठे उभे ठाकले आहेत. कारण आज सामना रंगणार आहे तो दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात. सध्याच्या घडीला दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाला आहे, त्यामुळे दिल्लीला बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना आता जवळपास सर्वच सामने जिंकायला लागतील. त्याचबरोबर कर्णधारपद गमावल्यावर गौतम गंभीरला संघात स्थान देण्यात आलेेले नाही, पण तरीही त्याच्याकडे असलेला अनुभव दिल्लीसाठी महत्वाचा असेल. त्यामुळे त्याला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळवणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. दुसरीकडे राजस्थानचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, पण हा सामना त्यांनी गमावला तर त्यांची थेट तळाच्या स्थानावर घसरण होऊ शकते. त्यामुळे हा सामना कोणता संघ जिंकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
दोन्ही संघ
दोन्ही संघांचे स्टेडियममध्ये आगमन
Web Title: DD vs RR, IPL 2018 LIVE: Ricky Ponting's Give Guidance To Prithvi Shaw
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.