दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण 

झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हायटल ( Guy Whittal ) याने पुन्हा एकदा मृत्यूला चकवा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 04:08 PM2024-04-25T16:08:28+5:302024-04-25T16:09:40+5:30

whatsapp join usJoin us
Former Zimbabwean star all-rounder Guy Whittal survives leopard attack, he and his dog fought off a leopard, which left him bloodied and in need of emergency surgery | दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण 

दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हायटल ( Guy Whittal ) याने पुन्हा एकदा मृत्यूला चकवा दिला. येथील ह्युमानी विभागात ट्रेकिंग करत असताना व्हायटलवर बिबट्याने हल्ला केला आणि तो व त्याचा कुत्रा बिबट्याशी लढला. पण, व्हायटल रक्तबंबाळ झाला आणि त्याला आपत्कालीन शस्त्रक्रियेची गरज होती. सप्टेंबर २०१३ मध्ये, व्हायटलला एक अख्खी रात्र ८ फुटी मगरीसोबत एकाच खोलीत काढावी लागली होती. व्हायटलच्या घरी त्याच्या पलंगाखाली आठ फूट लांबीची मगर होती.  


अहवालात असे म्हटले आहे की, ५१ वर्षीय व्हायटल ह्युमनी प्रदेशात ट्रेकिंग करत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्याच्यासोबत पाळीव कुत्रा चिकारा होता आणि त्याने बिबट्यावर हल्ला करून व्हायटलचे प्राण वाचवले. 


व्हायटलची पत्नी हॅना स्टूक्स व्हायटल हिने काही दिवसांपूर्वी तिच्या फेसबुक अकाउंटवर या घटनेची अधिक माहिती दिली होती. ''आज व्हायटलवर बिबट्याने हल्ला केला आणि भाग्यवान आहोत की तो या हल्ल्यात वाचला. हिप्पो क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने वैद्यकीय सेवा देऊन त्याला वाचवले. त्यानंतर त्याला बफेलो रेंजमधून ऐस ॲम्ब्युलन्सद्वारे हरारे येथे नेण्यात आले, त्यानंतर त्याला उपचारासाठी मिल्टन पार्क रुग्णालयात हलविण्यात आले. तो सध्या शस्त्रक्रियेची वाट पाहत आहे कारण, आज त्याचे रक्त खूप कमी झाले आहे,''असे तिने लिहिले.  


व्हायटलचे प्राण वाचवण्याचे श्रेय तिने चिकाराला दिले. तिने लिहिले की, “आमचा विश्वासू K9 चिकारा, व्हायटलचा हँडलर आणि ट्रॅकर्स. चिकारा उद्या पशुवैद्यकाकडे येणार आहे, बिबट्याने त्यालाही जखमी केले! खूप खास मुलगा.” 


एक क्रिकेटपटू म्हणून, व्हायटल या दोन क्षणांसाठी ओळखला जातो. हरारे येथे पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या शतकामुळे झिम्बाब्वेला १९९५ मध्ये पहिला कसोटी विजय मिळवून देण्यात मदत झाली होती. त्या कसोटीत मात्र त्याची ११३ धावांची नाबाद खेळी ग्रँट फ्लॉवरच्या नाबाद २०१ धावा आणि अँडी फ्लॉवरच्या १५६ धावांच्या खेळीसमोर दुर्लक्षित राहिले. झिम्बाब्वेने हा सामना एक डाव आणि ६४ धावांनी जिंकला होता. व्हायटलने बुलावायो येथे न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत २०३ धावांची द्विशतकीय खेळी केली होती.  त्याने ४६ कसोटीत २२०७ धावा केल्या, तर ५१ विकेट्स घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये १४७ सामन्यांत २७०५ धावा आणि ८८ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. 

Web Title: Former Zimbabwean star all-rounder Guy Whittal survives leopard attack, he and his dog fought off a leopard, which left him bloodied and in need of emergency surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.