नवी दिल्ली, दि. 17 - देशभरात 15 ऑगस्टला 71 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानंतर दोन दिवसांनी लोकांना एक वेगळा संदेश देण्यासाठी भारताचा गोलंदाज हरभजन सिंग याने एक हटके ट्विट केले आहे.
चला जाते मी आता झोपायला, पुन्हा 26 जानेवारीला भेटू... आपली देशभक्ती, असे ट्विट हरभजन सिंगने केले आहे. दरम्यान, हरभजन सिंगच्या ट्विटवरुन असे लक्षात येते की, तो काही तरी देशातील जनेतेला संदेश देत आहे. कारण अनेकवेळा आपण पाहतो की, लोक फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी जवळ आला की आपली देशभक्ती जागी होते. यावेळी झेंडा खरेदी करतो, देशभक्तीची गाणी ऐकूण आपल्यामध्ये देशप्रेम असल्याचे दाखविले जाते. याचबरोबर, ब-याच वेळा असे दिसून आले आहे की. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दुस-या दिवशी तिरंगा रस्त्यावर किंवा कुंड्यामध्ये पडलेला असतो.
दरम्यान, हरभजन सिंगने आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनी ट्विटवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या हरभजन सिंग क्रिकेटच्या मैदानापासून दूर होत आहे आणि सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या भारतीय संघ श्रीलंका दौ-यावर आहे. भारतीय संघाने येथील कॅन्डीमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी संघाचा कप्तान विराट कोहलीने ध्वजारोहण केले. याचबरोबर, आता कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारून व्हाइटवॉश देणारा भारतीय संघ आता आगामी होणा-या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेच्या तयारीला लागला आहे.
Web Title: Harbhajan Singh tweet on patriotism, 'I go to sleep, meet again on 26th January'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.