ICC World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामना अखेर रद्द

आता रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर साऱ्यांच लक्ष लागून राहिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 07:36 PM2019-06-13T19:36:06+5:302019-06-13T19:37:28+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: India-New Zealand match called off | ICC World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामना अखेर रद्द

ICC World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामना अखेर रद्द

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. आता रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर साऱ्यांच लक्ष लागून राहिले आहे.



 


 

बॅड न्यूज... भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचे सावट

इंग्लंडमधील विश्वचषकात काही आतापर्यंत तीन सामने पावसामुळे वाया गेले आहेत. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना होत असला तरी पावसामुळे अजूनही नाणेफेक करण्यात आलेली नाही. क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे ते भारत आणि पाकिस्तान सामन्यावर. हा सामना रविवारी मँचेस्टर येथे होणार आहे. पण या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामनाही पावसामुळे होऊ शकला नाही, तर चाहत्यांची निराशा होऊ शकते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे अजूनही सुरु होऊ शकलेला नाही. पण एका कार्यक्रमात बोलताना हरभजन सिंगने ही माहिती दिली. हरभजन सिंग हा हिंदी समाचोलन करण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

हरभजन म्हणाला की, " भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय येत आहे. यामुळे चाहतेही हिरमुसले आहेत. पण जर पावसामुळे सामने रद्द होऊ लागले तर दिग्गज संघांनाही मोठा फटका बसू शकतो. या सामन्यात पाऊस पडतोच आहे, पण भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी मँचेस्टर येथे होणार आहे. या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे."

रिषभ पंतला भारतीय ड्रेसिंग रुममध्ये नो एंट्री
भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो यापुढे विश्वचषकात खेळणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. शिखर जर खेळू शकणार नसेल तर संघात रिषभ पंतला स्थान देण्यात येऊ शकते. रिषभ पंत १६ जूनला मँचेस्टर येथे दाखल होणार आहे. पण रंतला मात्र भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एंट्री देण्यात येणार नाही.

धवनच्या दुखापतीमुळेच पंतला इंग्लंडला बोलावले गेले आहे. पण जर पंतला भारतीय संघाने बोलावले आहे तर त्याला ड्रेसिंग रुममध्ये स्थान का देण्यात येणार नाही, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. यासाठी सर्वात महत्वाचे कारण ठरला आहे एक नियम. हा नियम कोणता, ते आपण जाणून घेऊया.

आयसीसीचा नियम काय सांगतो...
जोपर्यंत एखाद्या खेळाडूला कोणत्याही कारणास्तव तुम्ही संघातून बाहेर करत नाही, तोपर्यंत नवीन खेळाडू संघात येऊ शकत नाही. धवन दुखापतग्रस्त असला तरी त्याला संघातून बाहेर काढण्यात आलेले नाही. पंतला धवनचा पर्याय म्हणून इंग्लंडला बोलावण्यात आले असले तरी त्याला बीसीसीआयने अधिकृतरीत्या संघात दाखल केलेले नाही. त्यामुळे धवनला संघाबाहेर केल्यावरच पंत संघात येऊ शकतो. त्यामुळे जर पंत हा संघाचा भाग नसेल तर तो संघाबरोबर राहू शकत नाही. त्याचबरोबर संघाच्या ड्रेसिंग रुममध्येही त्याला प्रवेश देण्यात येऊ शकत नाही.

Web Title: ICC World Cup 2019: India-New Zealand match called off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.