कार्डीफ, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून नव्या दमानं मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाने शनिवारी बांगलादेशच्या गोलंदाजांची दैना उडवली. 2011 व 2015 मध्ये बांगलादेशनं वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला पराभवाची चव चाखवली होती आणि 2019मध्येही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. पण, इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना हैराण केले. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. बेअरस्टो अर्धशतक झळकावून माघारी परतला, पण रॉयनं खिंड लढवताना शतक ठोकलं. शतकी धाव घेत असताना रॉयनं चुकीनं पंचांना धडक मारली.
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. रॉय आणि बेअरस्टो या जोडीनं बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना 15 षटकांत शतकी भागीदारी केली. 20व्या षटकात बांगलादेशला ही जोडी फोडण्यात यश आले. मशरफे मोर्ताझानं बेअरस्टोला माघारी पाठवले. मेहिदी हसनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. बेअरस्टो 50 चेंडूंत 6 चौकारासह 51 धावा करून माघारी परतला. त्यानंतर रॉयनं फटकेबाजी करताना शतक झळकावले. 96 धावांवर असताना फटका मारल्यानंतर रॉय नॉन स्ट्राईल एंडला धावत होता, पण त्याचे लक्ष चेंडूकडे होते. त्याच वेळी पंच त्याच्या समोर आले आणि तो त्यांना धडकला. रॉयच्या धडकल्यानं पंच जमिनीवर कोसळले आणि सर्व जण हसू लागले.
जेसन रॉयचे वन डे क्रिकेटमधील हे 9वे शतक ठरले, तर वर्ल्ड कपमधील पहिलेच. बांगलादेशविरुद्धही त्यानं प्रथमच शतकी खेळी केली. पण रॉयच्या धडकेनं स्टेडियमवर एकच हास्यकल्लोळ झाला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: ICC World Cup 2019 :That's a new way to celebrate a World Cup hundred, Jason Roy First time tackled an umpire
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.