लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहेत. इंग्लंडने सलग दोन सामन्यांत ( भारत व न्यूझीलंड) विजय मिळवल्याने पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. तरीही त्यांच्या चाहत्यांना चमत्काराची अपेक्षा आहे. पाकिस्तानला अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा सामना करायचा आहे. या सामन्यात पाकिस्तानने अशक्यप्राय विजय मिळवावा लागणार आहे. त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आजच्या लढतीत स्टेडियममध्ये एक मोठं झाड त्यांना मदत करू शकते. कसे चला चला जाणून घेऊया....
ICC World Cup 2019 : तरच पाकिस्तानचा होऊ शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश, हे आहे समीकरण
गोष्ट एका चेंडूवरील 286 धावांची...
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरीया यांच्या सामन्यात घडलेला हा प्रसंग आहे. 1894साली खेळवण्यात आलेल्या त्या सामन्यात एका चेंडूवर तब्बल 286 धावा निघाल्या होत्या. व्हिक्टोरीयाच्या फलंदाजाने टोलावलेला चेंडू मैदानावर असलेल्या झाडावर जाऊन अडकला. प्रतिस्पर्धी संघाने बॉल हरवल्याची घोषणा करावी, अशी मागणी पंचांकडे केली. पण, चेंडू दिसत असल्यामुळे पंचांनी तसे केले नाही आणि दरम्यान फलंदाजांनी पळून 286 धावा केल्या. बराच वेळ झाल्यानंतर त्या झाडाची फांदी कापण्यात आली आणि चेंडू खाली पडला. तो चेंडू झेलण्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना अपयश आले आणि त्या धावा ग्राह्य धरण्यात आल्या.
ICC World Cup 2019 : अख्तरने यांच्यावर फोडले पाकिस्तानच्या स्पर्धेबाहेर होण्याचे खापर!
पाकिस्तानलाही अशाच चमत्काराची गरज आहे.
पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर त्यांना 50 षटकांत किमान 350 धावा कराव्या लागतील. तसेच 350 धावा केल्यानंतर बांगलादेशला 39 धावांत गुंडाळावे लागेल. म्हणजेच 311 धावांनी विजय मिळवला लागेल.
ICC World Cup 2019 : देव करो अन् बांगलादेश संघावर वीज पडो, पाकच्या माजी खेळाडूचे अजब साकडे
दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना 50 षटकांमध्ये 400 धावा कराव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 84 धावांनी गुंडाळून 316 धावांनी विजय मिळवावा लागेल. असा विजय मिळवला तरच पाकिस्तानचा रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा अधिक होईल आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल.
ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा संघ डरपोक; मिळाला घरचा अहेर...
तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 450 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 129 धावांवर गुंडाळावे लागेल. म्हणजेच 321 धावांनी विजय मिळवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
पण, जर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यास, एकही चेंडू न खेळता पाकिस्तान स्पर्धेबाहेर फेकला जाईल.
Web Title: ICC World Cup 2019 : When 286 runs were scored off 1 ball – Pakistan fans believe there's hope for team against Bangladesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.