लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी क्रिकेटला अलविदा करणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील धोनीची कामगिरी लौकिकास साजेशी झालेली नाही. त्यामुळे त्याच्यावर टीकाही होत आहे. पण, यापलिकडे धोनी आणखी एका गोष्टीने चर्चेत आहे आणि ती म्हणजे त्याच्या बॅटवर लावण्यात आलेले लोगो... बांगलादेश व इंग्लंड यांच्याविरुद्धच्या सामन्यात धोनीनं बॅटवर दोन विविध प्रायोजकांचे लोगो लावलेले पाहायला मिळाले.. यामागचं कारण आम्ही शोधून काढलं आहे....
धोनीचा व्यवस्थापक अरुण पांडेने सांगितले की,''क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ-उतारांत धोनीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रायोजकांचे आभार मानण्यासाठी तो प्रत्येक सामन्यात बॅटवर विविध प्रायोजकांचे लोगो वापरत आहे. ही धोनीची आभार व्यक्त करण्याची स्टाईल आहे.''
BAS यांचा धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याच्या मार्गात महत्त्वाचा वाटा आहे. धोनी जेव्हा संघर्ष करत होता, तेव्हा या कंपनीनं त्याला सहकार्य केले. वर्ल्ड कप स्पर्धेत बॅटवर लोगो वापरण्यासाठी धोनी कोणत्याही प्रायोजकाकडून एक रुपयाही घेत नसल्याचे पांडेने सांगितले. त्याला या सर्वांचे आभार मानायचे आहे. पांडे म्हणाला,''धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर विविध लोगो वापरत आहे, त्यासाठी तो कोणतिही फी चार्ज करत नाही. त्याला सर्वांचे आभार मानायचे आहे. त्याला पैशांची गरज नाही, त्याच्याकडे पुरेसा पैसा आहे. त्यामुळे त्याचे हे कृत्य कृतज्ञता व्यक्त करणारे आहे.''
धोनीच्या या कृतीचे प्रायोजकांनीही कौतुक केले आहे. ''धोनी किती ग्रेट आहे, हे यावरूनच दिसते,'' अशी प्रतिक्रियी Vampire कंपनीचे मालक पुष्प कोहली यांनी दिली.
धोनीच्या दुखापतीवर आले 'हे' अपडेट, जाणून घ्या आहे तरी काय...
इंग्लंडविरुद्धच्या सामन्या धोनीचा अंगठा दुखावला होता. त्यामुळे काही काळ धोनी मैदानाबाहेरही होता. आता या दुखापतीवर अपडेट आले आहे. धोनीची ही दुखापत पूर्णपणे बरी झाली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये धोनी खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संघातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
Web Title: ICC World Cup 2019: Why MS Dhoni using different bat brandings?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.