मुंबई : सध्याच्या टीम इंडिया आक्रमक आहे. खेळामध्ये आक्रमता हवीच, कारण त्याशिवाय तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देऊ शकत नाही. दक्षिण आफ्रिकेमध्येही भारताला याच आक्रमक खेळाची आवश्यकता आहे,’ असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी व्यक्त केले.
मुंबई येथे डॉ. दयाल फाऊंडेशनच्या वतीने झालेल्या पुरस्कार समारंभावेळी वाडेकर बोलत होते. यावेळी वाडेकर यांना डॉ. रामेश्वर दयाल जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी रणजीपटू अमोल मुझुमदार, क्रिकेट प्रशासक प्रा. रत्नाकर शेट्टी, प्रशिक्षक प्रविण अमरे यांचाही गौरव करण्यात आले. तसेच, स्टार क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याचीही विशेष उपस्थिती यावेळी होती.
वाडेकर यांनी भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौºयाविषयी सांगितले की, ‘दक्षिण आफ्रिकेला नमवणे कायमच आव्हानात्मक राहिले आहे. तेथील खेळपट्ट्या वेगवान असल्याने तेथील परिस्थीतींशी लवकरात लवकर भारतीयांना जुळवून घ्यावे लागेल. त्यातच मालिकेआधी सराव सामनाही नसल्याने हा दौरा भारतासाठी आव्हानात्मक असेल. मात्र, आज खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळले जात असल्याने खेळाडू या परिस्थितीशी स्वत:ला जुळवून घेतील. टीम इंडिया समतोल असून आता खेळाडूंकडे बराच अनुभवही आला आहे. त्यामुळे त्यांना फारशी अडचण येणार नाही.’
कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमकतेबाबत वाडेकर म्हणाले की, ‘विराट वेगळ्या धाटणीचा खेळाडू आहे. तो केवळ आक्रमक नाही, तर प्रत्येकवेळी संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतो. त्याला हरणे आवडत नाही, जे संघासाठी खूप चांगले आहे.’
प्रत्येक क्रिकेटरच्या कारकिर्दीमध्ये बॅडपॅच येतो. अजिंक्य रहाणे सध्या याच काळातून जात आहे. याआधीच्या आफ्रिका दौºयातील रहाणेची सरासरी ६५ च्या आसपास आहे. माझ्यामते संघ आणि विशेष करुन निवड समितीचा त्यावर खूप विश्वास आहे. तो संघाचा उपकर्णधार असून आपल्यावर असलेल्या जबाबदारीची त्याला जाणीव आहे. त्यामुळेच मला विश्वास आहे की, येत्या एक महिन्यात तो आपल्या लौकिकानुसार नक्कीच कामगिरी करेल. आम्ही नेहमी एक संघ म्हणून काम करतो. तो जेव्हा शतक झळकावतो तेव्हा सगळे मला अभिनंदन करतात, त्याचप्रमाणे जेव्हा तो अपयशी ठरतो तेव्हा ती माझी जबाबदारी असते. त्यामुळे त्याच्यावर मेहनत घेणे हे माझे कर्तव्य आहे. रहाणेला नक्कीच एका मोठ्या खेळीची आवश्यकता आहे. त्याने अर्धशतकी खेळी केली तरी तो आपल्या फॉर्ममध्ये नक्की परतेल.
- प्रविण अमरे
Web Title: India needs aggressive play against South Africa - Ajit Wadekar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.