मुंबई- भारताचा सलामीवीर मुरली विजय इंग्लंड कसोटी मालिकेत पुन्हा एकदा अपयशी ठरला. पहिल्या कसोटीत त्याने अनुक्रमे २० व ६ धावा केल्या. लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही. वीरेंद्र सेहवागनंतर इंग्लंडमध्ये एकाच कसोटीत दोनवेळा शुन्यावर बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरला.
( India vs England 2nd Test: अँडरसन - ब्रॉडचा भेदक मारा, लॉर्ड्स कसोटीत भारताचा दारुण पराभव)
ख्रिस वोक्स आणि सॅम कुरान यांनी चौथ्या दिवशी इंग्लंडच्या धावसंख्येत ३९ धावांची भर घातली. कुरन बाद होताच इंग्लंडचा कर्णधार जो रूटने ७ बाद ३९६ धावांवर डाव घोषित केला. २८९ धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय फलंदाजांकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र मुरली विजयने तिसऱ्याच षटकात जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर विकेट फेकली. अँडरसनची ही लॉर्ड्सवरील १००वी विकेट ठरली.
विजय ड्रेसिंग रूममध्ये पोहचून आवराआवर करतो तोच अँडरसनने लोकेश राहुललाही माघारी पाठवले. भारताच्या सलामीच्या फलंदाजांचे अपयश पाहून क्रिकेट चाहते चांगलेच भडकले आणि त्यांनी विजयला टारगेट करताना सोशल मीडियावर त्याच्या इभ्रतीचे वाभाडे काढले.
चार वर्षांपूर्वी याच विजयने इंग्लंड कसोटीत ४०२ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून सर्वा धावा करणारा फलंदाज तो होता.
Web Title: India vs England 2nd test: Murli Vijay trolled on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.