ICC World Cup 2019, India vs. Pakistan: वर्ल्ड कप २०१९ मधील 'हाय व्होल्टेज ड्रामा'; अर्थात भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधला रणसंग्राम उद्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर रंगणार आहे. १९९२ ते २०१५ दरम्यानच्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये सहा वेळा हे 'शेजारी' आमनेसामने आलेत आणि टीम इंडियाने पाकिस्तानला पाणी पाजण्याचा एकही 'मौका' सोडलेला नाही. यावेळी पाकवर सातव्यांदा विजय मिळवून 'सातवे आसमां पर' जाण्याचा विडाच विराटसेनेनं उचलला आहे. या निमित्ताने, आधीच्या सहा सामन्यांमध्ये भारतानं कसा विजयाचा षटकार ठोकलाय, यावर एक नजर टाकू या...
सिडनी - १९९२
भारत - ४९ षटकांत ७ बाद २१६
पाकिस्तान - ४८.१ षटकांत सर्व बाद १७३
भारत ४३ धावांनी विजयी
सामनावीरः सचिन तेंडुलकर (नाबाद ५४)
........
बेंगलोर - १९९६
भारत - ५० षटकांत ८ बाद २८७
पाकिस्तान - ४९ षटकांत ९ बाद २४८
भारत ३९ धावांनी विजयी
सामनावीरः नवज्योतसिंग सिद्धू (९३ धावा)
.......
ओल्ड ट्रॅफोर्ड (इंग्लंड) - १९९९
भारत - ५० षटकांत ६ बाद २२७
पाकिस्तान - ४५.३ षटकांत सर्व बाद १८०
भारत ४७ धावांनी विजयी
सामनावीरः व्यंकटेश प्रसाद (२७ धावांत ५ बळी)
..........
सेन्चुरियन (द. आफ्रिका) - २००३
पाकिस्तान - ५० षटकांत ७ बाद २७३
भारत - ४५.४ षटकांत ४ बाद २७६
भारत सहा विकेट्सनी विजयी
सामनावीरः सचिन तेंडुलकर (९८ धावा)
..............
मोहाली - २०११
भारत - ५० षटकांत ९ बाद २६०
पाकिस्तान - ४९.५ षटकांत सर्व बाद २३१
भारत २९ धावांनी विजयी
सामनावीरः सचिन तेंडुलकर (८५ धावा)
.............
अॅडलेड (ऑस्ट्रेलिया) - २०१५
भारत - ५० षटकांत ७ बाद ३००
पाकिस्तान - ४७ षटकांत सर्व बाद २२४
भारत ७६ धावांनी विजयी
सामनावीरः विराट कोहली (१०७ धावा)
Web Title: India vs Pakistan, ICC World Cup: 1992 to 2015 ... six rivalries between team india and pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.