India Vs Pakistan, World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की प्रचंड तणाव हे आपसुकच येतो. केवळ या दोन देशांतीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांसाठी हा सामना पर्वणीच असतो. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेनं वाट पाहतो आणि पुढील 24 तासांत चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर रविवारी भारत-पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे. या लढतीपूर्वी मैदानाबाहेरच नेहमीप्रमाणे दोन्ही देशांमध्ये जाहिरात युद्ध पेटलं. पण, यावेळेस पाकिस्ताननं खालची पातळी गाठताना जाहिरातीत भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर केला. यंदाचा वर्ल्डकप आमचाच असेल, असा संदेश देणारी आक्षेपार्ह जाहिरात पाकिस्तानमधील वाहिनीनं तयार केली आहे. त्यावर भारतातून संताप व्यक्त करण्यात आला. या जाहिरात युद्धात आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे.
(आता पाकिस्तानच्या संघावरही करा एअर स्ट्राइक, भारतीय चाहते 'या' जाहिरातीनंतर खवळले)
भारतीयांच्या भावनांशी खेळणारी जाहिरात करणं पाकिस्तानला चांगलच महागात पडलं आहे. त्यांनी जगभरातून रोष ओढावून घेतलाच शिवाय त्यांच्याबद्दल असलेली नकारात्मकता आणखी वाढली आहे. आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत सहावेळा उभय संघ समोरासमोर आले आणि प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली आहे. यंदाच्या सामन्यातही त्याचीच पुनरावृत्ती होईल असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं भारत-पाक सामन्यावर केलेल्या जाहिरातीला प्रतुत्यर म्हणून पाकिस्तानच्या एका वाहिनीनं पातळी सोडून एक जाहिरात तयार केली.
( पावसाच्या बॅटिंगला सोशल मीडियाचा तडका, वाचा भन्नाट मिम्स ! )
27 फेब्रुवारीला अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ते चहा पित असताना दिसत होते. याच व्हिडीओच्या धर्तीवर पाकिस्तानी वाहिनीनं एक जाहिरात तयार केली. यामध्ये अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पित आहे. त्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. टॉस जिंकल्यावर काय करणार, कोणत्या अकरा खेळाडूंना संधी मिळेल असे प्रश्न त्या व्यक्तीला विचारण्यात आले. 'मी हे तुम्हाला सांगू शकत नाही', अशी अभिनंदन यांनी दिलेली उत्तरं जाहिरातीमधील व्यक्तीनं दिली.
( भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल...)
यानंतर जाहिरातीमधील अभिनंदन यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला तिथून जाण्यास सांगितलं जातं. ती व्यक्ती चहाचा कप घेऊन तिथून जाऊ लागते. तितक्यात त्या व्यक्तीला कप घेऊन कुठे चाललास, असा प्रश्न विचारण्यात येतो. या ठिकाणी चहाच्या कपचा आधार घेत वर्ल्डकपवर भाष्य करण्यात आलं आहे. जाहिरात तयार करताना पाकिस्तानी वाहिनीनं पातळी सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. त्याला सडेतोड उत्तर देणारी जाहिरात भारतातीत एका यु ट्यूब सेलिब्रेटीनं केली आहे. त्यात युवराज सिंगसारखा दिसणारा खेळाडू दाखवण्यात आला आहे आणि त्याला पाकिस्तानी खेळाडू फादर डे च्या निमित्तानं रुमाल गिफ्ट देतो. त्यानंतर जे घडतं ते पाहाच...
( पाकिस्तानच्या 'या' चाहत्याला धोनी देतो प्रत्येक सामन्याचे तिकीट )
पाहा व्हिडीओ...
या व्हिडीओवरून नेटिझन्सनेही पाकिस्तानला डिवचण्याची संधी सोडली नाही.
Web Title: India Vs Pakistan, World Cup 2019 Live : Indian YouTube stars give 'awesome' reply to Pakistan's Abhinandan ad in viral video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.