IPL 2019 : 16 वर्षीय प्रयासचे RCBकडून पदार्पण; युवराजपेक्षा ठरला होता महागडा

IPL 2019 : रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या आजच्या सामन्यात विराट कोहलीनं नव्या युवा खेळाडूला अंतिम अकरामध्ये संधी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 03:55 PM2019-03-31T15:55:20+5:302019-03-31T15:55:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : 7 facts about 16 year old Prayas Ray Barman: Debut for RCB in IPL | IPL 2019 : 16 वर्षीय प्रयासचे RCBकडून पदार्पण; युवराजपेक्षा ठरला होता महागडा

IPL 2019 : 16 वर्षीय प्रयासचे RCBकडून पदार्पण; युवराजपेक्षा ठरला होता महागडा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या आजच्या सामन्यात विराट कोहलीनं नव्या युवा खेळाडूला अंतिम अकरामध्ये संधी दिली आहे. आजच्या या सामन्यात 16 वर्षीय प्रयास रे बर्मन आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. जयपूर येथे झालेल्या लिलावात RCBने प्रयासला 1.50 कोटी रुपयांत आपल्या चमूत दाखल करुन घेतले. 20 लाख मुळ किंमत असलेल्या प्रयासला संघात घेण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबही उत्सुक होते, परंतु बंगळुरूने बाजी मारली. 

  • दुर्गापूर येथे 25 ऑक्टोबर 2002 मध्ये प्रयास रे बर्मनचा जन्म झाला. त्याचे वडील कौशिक रे बर्मन हे डॉक्टर आहेत आणि ते प्रयासला नवी दिल्लीत घेऊन आले. 
  • दक्षिण दिल्लीतल्या गार्गी कॉलेजमधील राम पाल क्रिकेट अकादमीतून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. पण, दुर्गापूर क्रिकेट केंद्रात त्यानं शिबनाथ रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले. 
  • अंबर रॉय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करून प्रयासने सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर बंगालच्या 16 वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. उत्तर कोलकाता येथील दुमदुम पार्क येथे लहानशा खोलीत तो राहत होता. त्याच्या वडिलांनी नवी दिल्लीतून पुन्हा कोलकाता येथे स्थलांतर केले. 
  • RCB नं ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर प्रयास बंगळुरूत राहायला आला, तेथे त्याची बहिण आयटी क्षेत्रात काम करते.
  • बंगालच्या 15 वर्षांखालील संघाकडून खेळताना त्याने 2012-13च्या मोसमात 4 सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या.
  • विजय हजारे चषक स्पर्धेत त्यानं बंगालकडून लिस्ट A क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2018 मध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध तो पहिला सामना खेळला. पहिल्याच सामन्यात त्यानं 5 षटकांत 20 धावा देताना 4 विकेट घेतल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. प्रयासने 11 लिस्ट A क्रिकेट सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत.  
  • फिरकीपटू असलेला प्रयास हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याचा चाहता आहे. 
  • त्याला विराट कोहलीसह खेळायचे होते आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे. 
     

Web Title: IPL 2019 : 7 facts about 16 year old Prayas Ray Barman: Debut for RCB in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.