मोहाली, आयपीएल २०१९ : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता दिल्ली कॅपिटल्सची एकेकाळी ३ बाद १४४ अशी मजबूत स्थिती होती. पण त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी कच खाल्ली आणि सहज जिंकणारा सामना त्यांना गमवावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने १६६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 152 धावा करता आल्या आणि पंजाबने हा सामना १४ धावांनी जिंकला. या सामन्यात सॅम कुरनने हॅट्ट्रिक घेत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
11:42 PM
हनुमा विहारी आऊट
दिल्लीला विहारीच्या रुपात आठवा धक्का बसला. विहारीला दोन धावा करता आल्या.
11:40 PM
हर्षल पटेल आऊट
एकही धाव न करता पटेल बाद झाला.
11:38 PM
कॉलिन इनग्राम आऊट
स्थिरस्थावर झालेला इनग्राम बाद झाला आणि दिल्लीला मोठा धक्का बसला. इनग्रामने २९ चेंडूत ३८ धावा केल्या.
11:36 PM
रिषभ पंत आऊट
पंतला मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले. पंतने २६ चेंडूंत ३९ धावा केल्या.
11:08 PM
शिखर धवन आऊट
शिखर धवनच्या रुपात दिल्लीला तिसरा धक्का बसला. धवनने २५ चेंडूंत ३० धावा केल्या.
11:07 PM
श्रेयस अय्यर आऊट
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने २२ चेंडूंत २८ धावा केल्या.
10:26 PM
दिल्ली १ बाद ३९
एकही धाव झाली नसताना दिल्लीने पृथ्वी शॉला गमावले होते. पण त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी केली.
10:12 PM
पृथ्वी शॉ आऊट
पहिल्याच ेचंडूवर पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने पृथ्वीला बाद केले. पृथ्वीला यावेळी एकही धाव काढता आली नाही.
09:44 PM
मुरुग्गन अश्विन आऊट
मुरुग्गन अश्विनच्या रुपात पंजाबला आठवा धक्का बसला. अश्विनला फक्त एक धाव करता आली.
09:41 PM
आर. अश्विन आऊट
पंजाबचा कर्णधार आर. अश्विन तीन धावांवर आऊट झाला.
09:37 PM
हार्डुस विल्जन आऊट
हार्डुस विल्जनला फक्त एक धावच करता आली.
09:28 PM
डेव्हिड मिलर आऊट
डेव्हिड मिलरच्या रुपात पंजाबला पाचवा धक्का बसला. मिलरने ४३ धावांची खेळी साकारली.
09:13 PM
सर्फराझ खान आऊट
सर्फराझ खानच्या रुपात पंजाबला चौथा धक्का बसला. सर्फराझने २९ चेंडूंत सहा चौकारांसह ३९ धावा केल्या.
08:21 PM
सॅम कुरन आऊट
कुरनच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का बसला. कुरनने २० धावा केल्या.
08:10 PM
लोकेश राहुल आऊट
राहुलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला. राहुलने यावेळी १५ धावा केल्या.
08:08 PM
दिल्लीने नाणेफेक जिंकली, पंजाबची प्रथम फलंदाजी
पंजाविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने यावेळी पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.
Web Title: Ipl 2019 KXIP vs DC live update : दिल्लीवर पंजाबचा विजय
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.