KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 

KL Rahul ने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची दावेदारी भक्कम केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 09:14 PM2024-04-27T21:14:56+5:302024-04-27T21:16:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Live : KL Rahul ( 76) becomes the fastest opener in IPL history to score 4000 runs, LSG 196/5 against RR | KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 

KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Live : KL Rahul ने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची दावेदारी भक्कम केली. लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात काही खास झाली नसताना कर्णधार लोकेशने ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि दीपक हुडासह राजस्थान रॉयल्सला कडवी टक्कर दिली. पण, RR च्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत चांगला मारा करून LSG ला आणखी मोठ्या धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

 इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 


राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. ट्रेंट बोल्टने त्याचा पहिल्या षटकात विकेट घेण्याचा पराक्रम याही सामन्यात कायम राखताना क्विंटन डी कॉकचा ( ८) त्रिफळा उडवला. त्यात संदीप शर्माने दुसऱ्या षटकात मार्कस स्टॉयनिसचा ( ०) त्रिफळा उडवून LSG ला ११ धावांवर दुसरा धक्का दिला. पण, कर्णधार लोकेश राहुल व दीपक हुडा ही जोडी मैदानावर उभी राहिली. लोकेशने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना संघाला १० षटकांत २ बाद ९४ धावांपर्यंत पोहोचवले. 


आर अश्विनने १३व्या षटकात RR ला मोठी विकेट मिळवून दिली. दीपक हुडा ३१ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५० धावांवर बाद झाला आणि लोकेशसह त्याची ६२ चेंडूंत ११५ धावांची भागीदारी संपुष्टात आली.  आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून ४००० धावांचा टप्पा लोकेशने ओलांडला आणि शिखर धवन ( ६३६२), डेव्हिड वॉर्नर ( ५९०९), ख्रिस गेल ( ४४८०), विराट कोहली ( ४०४१) यांच्यानंतर तो पाचवा सलामीवीर ठरला. LSG ने १५ षटकात फलकावर दीडशे धावा चढवल्या. १६व्या षटकांत निकोलस पूरन ( ११) संदीप शर्माच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

आता मोठे फटके मारण्याची जबाबदारी लोकेशवर होती आणि त्याच प्रयत्नात तो झेलबाद झाला. लोकेशने ४८ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७६ धावा केल्या.  LSG ला ५ बाद १९६ धावा करता आल्या. 

Web Title: IPL 2024, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Live : KL Rahul ( 76) becomes the fastest opener in IPL history to score 4000 runs, LSG 196/5 against RR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.