CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह

 इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे धर्मशालाच्या नयनरम्स स्टेडियमवर खेळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 04:04 PM2024-05-05T16:04:30+5:302024-05-05T16:05:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : Chennai Super Kings pacer Matheesha Pathirana is nursing a hamstring injury and will be returning to Sri Lanka for further recovery, Mustafizur Rahman has gone back for international duty  | CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह

CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi :  इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे धर्मशालाच्या नयनरम्स स्टेडियमवर खेळत आहेत. PBKS ने चेपॉकवर CSK ला पराभूत करून मोठी कामगिरी केली आणि CSK याची परतफेड करण्यासाठी सज्ज आहेत. पण, त्यांना प्रमुख गोलंदाज दीपक चहर याच्याशिवाय मैदानावर उतरावे लागले. चेन्नई १० सामन्यांत ५ विजयांसह पाचव्या, तर पंजाब १० सामन्यांत ४ विजयांसह आठव्या क्रमांकावर आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. चेन्नई व पंजाब यांच्यात झालेल्या २९ पैकी १५ सामन्यांत चेन्नईने बाजी मारली आहे. पण, चेन्नईच्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. 

Milestones Alert:

  • शिवम दुबेला आयपीएलमध्ये १०० षटकार पूर्ण करण्यासाठी एक उत्तुंग फटका हवा आहे
  • महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमध्ये २५० षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी दोन सिक्स मारावे लागतील
  • जितेश शर्मा हा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५०० धावांपासून फक्त ६९ धावा दूर आहे.   

 

ऋतुराज गायकवाडने ११ पैकी १० सामन्यांत टॉस गमावला आहे. २०१२ मध्ये जेव्हा महेंद्रसिंग धोनी CSK चा कर्णधार होता, तेव्हा त्याने १२ सामन्यांत टॉस गमावलेला, परंतु आयपीएल ट्रॉफी फायनल खेळली होती. पंजाब किंग्सविरुद्ध ऋतुला टॉस गमवावा लागला, पंजाबने लक्ष्याचा पाठलाग करणे पसंत केले आहे.

CSK च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मुस्ताफिजूर रहमानच्या जागी मिचेल सँटनर खेळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी बांगलादेशचा गोलंदाज मायदेशात परतला आहे. मागील सामन्यात आजारी पडलेला तुषार देशपांडे पुनरागमन करतोय, परंतु तेच मथिशा पथिराणा ( Matheesha Pathirana) हा हॅमस्ट्रींगमुळे मायदेशात परतला आहे. तो श्रीलंकेत जाऊन पुढील उपचार घेणार आहे. पथिराणाने ७.६८च्या इकॉनॉमीने यंदाच्या आयपीएलमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत. दीपक चहर याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. 

Web Title: IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : Chennai Super Kings pacer Matheesha Pathirana is nursing a hamstring injury and will be returning to Sri Lanka for further recovery, Mustafizur Rahman has gone back for international duty 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.