१७ चेंडूंत ८४ धावा! ट्रॅव्हिस हेडचे वादळी शतक पाहून विराट हतबल; काव्या मारन आनंदाने नाचू लागली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात स्टार खेळाडूंना भरणा आहे, परंतु त्यांना मॅच विनर गोलंदाज अजूनही सापडलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 08:25 PM2024-04-15T20:25:32+5:302024-04-15T20:28:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : SRH SCORED 103/0 IN JUST 7.1 OVERS, HUNDRED FOR TRAVIS HEAD IN JUST 39 BALLS, Kavya Maran enjoying, Video | १७ चेंडूंत ८४ धावा! ट्रॅव्हिस हेडचे वादळी शतक पाहून विराट हतबल; काव्या मारन आनंदाने नाचू लागली

१७ चेंडूंत ८४ धावा! ट्रॅव्हिस हेडचे वादळी शतक पाहून विराट हतबल; काव्या मारन आनंदाने नाचू लागली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात स्टार खेळाडूंना भरणा आहे, परंतु त्यांना मॅच विनर गोलंदाज अजूनही सापडलेला नाही. मोहम्मद सिराजवर मदार होती, त्याने धावांची गळती केलीय आणि म्हणून त्याला बसवले गेले. पण, सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी RCB च्या याच कमकुवत बाबीचा फायदा उचलून तुफान फटकेबाजी केली. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी ७.१ षटकांत फलकावर शतकी पल्ला उभा केला. 

Controversy! फॅफ ड्यू प्लेसिसने MI विरुद्धचा 'Toss' चा झोल पॅट कमिन्सला सांगितला? Video Viral 

IPL 2024 मध्ये RCB चा सहापैकी ५ सामन्यांत पराभव झाला आहे आणि आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना विजय आवश्यक आहे. SRH ने ५ मध्ये ३ सामने जिंकून चौथे स्थान पटकावले आहे. मागील सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावूनही RCB ला हार पत्करावी लागली. स्पर्धेतील आव्हान टिकवायचे असेल तर विराटला सर्व सहकाऱ्यांनी साथ देणे आवश्यक आहे. ल्युकी फर्ग्युसनने आजच्या सामन्यातून RCB कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांनी आज मोहम्मद सिराज व ग्लेन मॅक्सवेल यांना बाकावर बसवले. 

c
पण, गोलंदाजीत बदल करूनही RCB ला काही लाभ झालेला दिसला नाही. SRH चे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी RCB च्या गोलंदाजांना चोप दिला. हेडने २० चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याला अभिषेकची दमदार साथ मिळाली. या दोघांनी ७.१ षटकांत शतकी पल्ला पार केला. विराट कोहलीसह RCB चे सर्व खेळाडू हताश झालेले पाहायला मिळाले. आयपीएलच्या याच पर्वात SRH ने मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी २७७ धावा कुटल्या होत्या आणि ती भीती RCB च्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर दिसली. ९व्या षटकात अभिषेकने स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू टोलवला आणि फर्ग्युसनने तो टिपला. अभिषेक २२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर रिसे टॉप्लीच्या गोलंदाजीवर बाद झाला.  


पण, हैदराबादच्या चौकार-षटकारांचा ओघ आटला नाही. त्यांनी हेनरिच क्लासेनला बढती देताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. ट्रॅव्हिस हेडचा पॉवर प्ले सुरूच राहिला आणि त्याने संघाला १० षटकांत १२८ धावांपर्यंत पोहोचवले. हेड जिथे जिथे फटके मारत होता तिथे बंगळुरूचे खेळाडूच उपस्थित नसलेले दिसले आणि त्यामुळे चौकार सहज मिळाले. हेडने ३९ चेंडूंत शतक झळकावले आणि आयपीएल इतिहासातील हे चौथे वेगवान शतक ठरले. त्याच्या या शतकात ९ चौकार व ८ षटकार अशा अवघ्या १७ चेंडूंत ८४ धावा कुटल्या गेल्या.

Image

Web Title: IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : SRH SCORED 103/0 IN JUST 7.1 OVERS, HUNDRED FOR TRAVIS HEAD IN JUST 39 BALLS, Kavya Maran enjoying, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.