... तर 'या' दिवशी महेंद्रसिंग धोनी खेळणार अखेरचा सामना?

महेंद्रसिंग धोनीची कामगिरी हाही एक चर्चेचा विषय ठरलेला आणि बीसीसीआयनं त्याला सन्मानाने निवृत्त होण्याचा सल्ला दिल्याचे समजते आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 02:58 PM2019-07-16T14:58:18+5:302019-07-16T14:59:57+5:30

whatsapp join usJoin us
Mahendra Singh Dhoni will retire on this day? | ... तर 'या' दिवशी महेंद्रसिंग धोनी खेळणार अखेरचा सामना?

... तर 'या' दिवशी महेंद्रसिंग धोनी खेळणार अखेरचा सामना?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहू लागण्याची चर्चा आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह कर्णधार विराट कोहली यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्याची मागणी होत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत पाच शतकांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात यावे, अशीही मागणी सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) नेतृत्वबदलाचे संकेत दिले आहेत. यासह महेंद्रसिंग धोनीची कामगिरी हाही एक चर्चेचा विषय ठरलेला आणि बीसीसीआयनं त्याला सन्मानाने निवृत्त होण्याचा सल्ला दिल्याचे समजते आहे. या वृत्तात सत्यता असल्यास धोनीचा अखेरचा सामना कधी व कोठे असेल? 

BREAKING: बीसीसीआयमध्ये मेगाभरती; मुख्य प्रशिक्षकासह महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज

विंडीज दौऱ्यात टीम इंडियात नव्या खेळाडूंना संधी, 'या' दिग्गजांना विश्रांती?

2011मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीला यंदा फार चांगली कामगिरी करता आलेली नाही.  निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद लवकरच धोनीशी या संदर्भात चर्चा करणार आहेत. धोनीनं स्वतःहून निवृत्तीचा निर्णय न घेतल्यास, त्याला पुढे संघातून कधी खेळायला मिळेल, याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे असा प्रसंग उभा राहण्यापूर्वीच प्रसाद हे धोनीशी चर्चा करणार आहेत. तसेही 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीत धोनीच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत निवड समितीकडून मिळत आहेत. त्यामुळे त्याला सन्मानपुर्वक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारायला हवी. ''


जर धोनीनं निवड समितीचा हा प्रस्ताव मान्य केल्यास अखेरचा सामना कधी होईल, हे जाणून घेऊया..
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांसह दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघात काही नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड 19 जुलैला होणार आहे. या मालिकेत महेंद्रसिंग धोनीला विश्रांती दिली जाऊ शकते. 
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ 15 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत भारत दौऱ्यावर येणार आहे. यात तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामने होणार आहेत. धोनीनं कसोटीतून निवृत्ती घेतल्यानं आणि आगामी 2020 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता धोनीला या मालिकेत खेळण्याची संधी मिळेल याची शक्यता कमीच आहे. 


बांगलादेश 3 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत भारत दौऱ्यात तीन ट्वेंटी-20 व दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ 6 ते 22 डिसेंबर या कालावधीत भारतात तीन ट्वेंटी-20 व तीन वन डे सामना खेळणार आहे. याच मालिकेत धोनी कदाचित अखेरचा वन डे सामना खेळून निवृत्ती स्वीकारू शकतो. हे तीन वन डे सामने चेन्नई, विशाखापट्टणम आणि कटक येथे होणार आहेत. त्यापैकी अखेरचा सामना खेळायचं झाल्यास धोनी चेन्नईची निवड करू शकतो आणि तो सामना 15 डिसेंबरला होणार आहे..


रांचीत निवृत्ती घ्यायची झाल्यास...
कॅप्टन कूल धोनीला घरच्या मैदानावर निरोपाचा सामना खेळवायचे ठरल्यास वेळापत्रकात बदल अपेक्षित आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार 10 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा संघ रांची येथे कसोटी सामना खेळणार आहे. पण, येथे वन डे सामन्यासाठी दुसरीकडे हलवला जाऊ शकतो आणि 22 डिसेंबरला वेस्ट इंडिजविरुद्धचा कटक येथे होणारा वन डे सामना रांची येथे हलवला जाऊ शकतो.

Web Title: Mahendra Singh Dhoni will retire on this day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.