ठळक मुद्देआयपीएलचा पहिलाच सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात अखेर बाजी मारली ती चेन्नई सुपर किंग्जने.
मुंबई : आयपीएलचा पहिलाच सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात अखेर बाजी मारली ती चेन्नई सुपर किंग्जने. ड्वेन ब्राव्होच्या झंझावाती फलंदाजीमुळे चेन्नईला विजय साकारता आला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे 166 धावांचे आव्हान ठेवले होते. बिनीचे फलंदाज बाद झाल्यावरही ब्राव्होने एकट्याने किल्ला लढवला आणि चेन्नईने एक विकेट राखून विजय मिळवत आपले गुणांचे खाते उघडले. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ब्राव्होने 30 चेंडूंत 68 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
चेन्नईच्या डावाची शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी संयत सुरुवात करून दिली. पण मोठी खेळी साकारण्यात हे दोघेही अपयशी ठरले. या दोघांनाही हार्दिक पांड्याने बाद केले. हे दोघे बाद झाल्यावर सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे झटपट बाद झाले. त्यामुळे चेन्नईचा डाव संकटात सापडला होता. रैना आणि धोनी या दोन्ही नावाजलेल्या फलंदाजांना मयांक मार्कंडेने बाद केले. पंधराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मिस्ताफिझूर रेहमानने रवींद्र जडेजाला 12 धावांवर बाद केले. मार्कंडेने आपल्या अखेरच्या चेंडूवर दीपक चहारला बाद केले. आपल्या चार षटकांमध्ये मार्कंडेने 23 धावांत तीन बळी मिळवले. एकामागून एक विकेट्स पडत असताना ड्वेन ब्राव्होने संघाची बाजू सांभाळली होती. एकाबाजूने तो मुंबईच्या गोलंदाजीवर प्रहार करत होता. ब्राव्हो आता चेन्नईला सामना जिंकवून देणार असे वाटत होते, पण 19व्या षटकात त्याला जसप्रीत बुमराने बाद केले. ब्राव्होने 30 चेंडूंत 3 चौकार आणि सात षटकारांची आतिषबाजी करत 68 धावा फटकावल्या. पण त्यानंतर जखमी झालेला केदार जाधव फलंदाजीला आला. अखेरच्या षटकातील पहिले तीन चेंडू निर्धाव गेले, पण त्यानंतरच्या चौथ्या चेंडूवर केदार जाधवने षटकार लगावला आणि चेन्नईच्या बाजूने सामना झुकवला. त्यानंतरच्या चेंडूवर केदारने दिमाखात चौकार लगावला आणि चेन्नईच्या संघाने विजयाचा जल्लोष केला.
चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या हंगामातील पहिला चौकार आणि षटकार लगावला. पण रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. शेन वॉटसनने 15 धावांवर असताना रोहितला बाद केले. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव (43) आणि इशान किशन (40) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली. पण ठराविक फरकाने हे दोघेही बाद झाल्यावर हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंनी जोरदार फटकेबाजी केली. हार्दिकपेक्षा कृणाल अधिक आक्रमक फलंदाजी करत होता. कृणालने चेन्नईच्या गोलंदाजीची पिसे काढली आणि 22 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 41 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. हार्दिकने 20 चेंडूंत 2 चौकारांसह नाबाद 22 धावा केल्या.
11.44 PM : चेन्नईने पहिला सामना जिंकला,मुंबई इंडियन्सवर एक विकेट राखून मात
11.39 PM : ब्राव्हो OUT; 30 चेंडूंत फटकावल्या 68 धावा
11.37PM : ब्राव्होची धडाकेबाज फटकेबाजी, 28 चेंडूंत फटकावल्या 62 धावा
11.16 PM : हरभजन सिंग बाद; चेन्नई 15 षटकांत 7 बाद 106
मिचेल मॅक्लेघनने 15 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हरभजनला बाद करत चेन्नईच्या संघाला सातवा धक्का दिला.
10.56 : चेन्नईची 12व्या षटकात 5 बाद 75 अशी स्थिती; जडेजाच्या रुपात धक्का
पंधराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चेन्नईचा रवींद्र जडेजा बाद झाला. मिस्ताफिझूर रेहमानने जडेजाला 12 धावांवर बाद केले.
10.24 PM : चेन्नई सुपरकिंग्जला मोठा झटका; कर्णधार धोनी 5 धावांवर बाद
धोनीकडून संघाला फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण मार्कंडेने त्याला पायचीत पकडत तंबूचा रस्ता दाखवला.
10.23 PM : हार्दिककडून चेन्नईला दुसरा धक्का, सुरेश रैना चार धावांवर बाद
मुंबईच्या हार्दिक पंड्याने शेन वॉटसननंतर चेन्नईचा भरवश्याचा फलंदाज सुरेश रैनालाही बाद केले.
10.19 PM : पाच षटकांत चेन्नईच्या 1 बाद 39 धावा
मुंबईच्या 166 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची पहिल्या पाच षटकांमध्ये 1 बाद 39 अशी स्थिती होती. हार्दिक पंड्याने चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनला बाद केले होते.
10.11 PM : चेन्नईला शेन वॉटसनच्यारुपात पहिला धक्का
मुंबईच्या हार्दिक पांड्याने शेन वॉटसनला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. वॉटसनने 14 चेंडूंत 16 धावा केल्या.
9.47 IPL 2018 : कृणाल पंड्याची फटकेबाजी; मुंबईने मारली 165 धावांपर्यंत मजल
मुंबई : कृणाल पंड्याने केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात 165 धावा केल्या.
चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या हंगामातील पहिला चौकार आणि षटकार लगावला. पण रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. शेन वॉटसनने 15 धावांवर असताना रोहितला बाद केले. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव (43) आणि इशान किशन (40) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली. पण ठराविक फरकाने हे दोघेही बाद झाल्यावर हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंनी जोरदार फटकेबाजी केली. हार्दिकपेक्षा कृणाल अधिक आक्रमक फलंदाजी करत होता. कृणालने चेन्नईच्या गोलंदाजीची पिसे काढली आणि 22 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 41 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. हार्दिकने 20 चेंडूंत 2 चौकारांसह नाबाद 22 धावा केल्या.
9.37 pm : मुंबईचे चेन्नईपुढे 166 धावांचे आव्हान
- कृणाल पंड्याने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली, त्याने 22 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 41 धावांची धमाकेदार खेळी साकारली.
9.12 pm : मुंबईची 15 षटकांनंतर 4 बाद 117 अशी स्थिती
- रोहित शर्मा आणि इव्हिन लुईसनंतर सूर्यकुमार यादव व इशान किशन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली.
8.59 सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईला तिसरा धक्का
सूर्यकुमारने 29 चेंडूत 43 धावांची धडाकेबाज खेळी साकारली, यामध्ये सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
8.55 सूर्यकुमार यादवची चौकारांची हॅट्रिक
- सूर्यकुमारने ड्वेन ब्राव्होच्या 12व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर चौकार लगावले.
8.53 : इम्रान ताहिरच्या 11व्या षटकात मुंबईने फटकावल्या 18 धावा
इम्रान ताहिरच्या 11 व्या षटकात दोन चौकार आणि एका षटकारासह मुंबईने 18 धावांची लूट केली.
8.50 मुंबईची 10 षटकांनंतर 2 बाद 65 अशी स्थिती
सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी संघाचा डाव सावरला आणि संघाला 10 षटकांमध्ये 65 अशी धावसंख्या उभारून दिली.
8.48 सूर्यकुमार आणि इशान यांची अर्धशतकी भागीदारी
सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 39 चेंडूंत 55 धावांची भागीदारी रचली.
8.40 मुंबईची 9 षटकांत 2 बाद 62 अशी अवस्था
आयपीएलच्या पहिल्या टाईम आऊटच्यावेळी मुंबईने दोन्ही सलामीवीर गमावून 62 धावा केल्या. सूर्यकुमार यादव (28) आणि इशान किशन (18) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचली आहे.
8.29 : पहिल्या पॉवर-प्लेनंतर मुंबईची 2 बाद 39 अशी स्थिती
- पहिल्या पॉवर-प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा आणि इव्हिन लुईस या दोन्ही सलामीवीरांना गमावले.
8.18 PM : रोहित शर्मा OUT, मुंबईला मोठा धक्का (4 षटकांत 2 बाद 22)
- शेन वॉटसनने अंबाती रायुडूकरवी रोहितला बाद केले. रोहितने एक षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर 15 धावा केल्या.
8.09 : इव्हिन लुईसच्या रुपात मुंबईला पहिला धक्का
8.02pm :रोहित शर्माने केली चौकाराने सामन्याला सुरुवात
7.30 pm : चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली
आयपीएलचा उद्घाटन सोहळा चांगलाच रंगतदार झाला. क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अकराव्या सत्राचे धमाकेदार उद्घाटन झाले. गताविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सलामीच्या सामन्याआधी झालेल्या या शानदार कार्यक्रमात बॉलीवूड स्टार्सच्या धमाकेदार नृत्यकलाचा तडका बसला. आता साऱ्यांना उत्सुकता आहे ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सलामीच्या लढतीची. मुंबईचा संघ आपल्या घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा करणार की महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विजयाने लीगची सुरुवात करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले.
दोन्ही संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जयप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्ताफिझूर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, इशान किशन, राहुल चहर, इव्हिन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जेपी ड्युमिनी, तजींदर सिंग, शरद लुम्बा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, अकिला धनंजया, अनुकूल रॉय, मोहसिन खान, एमडी निधीश, मिचेल मॅक्लेघन.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, जगदीशन नारायण, मिचेल सँटनर, दीपक चहार, के.एम. आसिफ, लुंगी एनगिडी, कनिष्क सेठ, ध्रुव शौरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, मार्क वूड, क्षितीज शर्मा, मोनू सिंग, चैतन्य बिश्नोई.
Web Title: MI vs CSK, IPL 2018 LIVE SCORE: Mumbai Indians Vs Chennai Super Kings IPL 2018 Live Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.