MI vs RCB, IPL 2018 LIVE : वानखेडेवर मुंबईच्या विजयाचा श्रीगणेशा

रोहितच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात 213 अशी विशाल धावसंख्या उभारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 07:48 PM2018-04-17T19:48:34+5:302018-04-17T23:51:59+5:30

whatsapp join usJoin us
MI vs RCB, IPL 2018 LIVE: Rohit Sharma likely to bat in fourth position | MI vs RCB, IPL 2018 LIVE : वानखेडेवर मुंबईच्या विजयाचा श्रीगणेशा

MI vs RCB, IPL 2018 LIVE : वानखेडेवर मुंबईच्या विजयाचा श्रीगणेशा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरोहितने 52 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर खणखणीत 94 धावांची खेळी साकारली.

मुंबई : आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने मंगळवारी विजयाचा श्रीगणेशा केला. मुंबईने रोहित शर्माच्या स्फोटक खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जमले नाही. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज दिली, पण त्यानंतरही त्यांना मुंबईकडून 46 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह मुंबईने आपले गुणांचे खाते उघडले.

मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुने संयत सुरुवात केली. पण त्यांनी क्विंटन डी'कॉक आणि एबी डी'व्हिलियर्स यांना झटपट गमावले आणि तिथेच बंगळुरुचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. पण त्यानंतरही कोहलीने एकाकी झुंज देत अर्धशतक पूर्ण केले, त्याचबरोबर कोहलीने बंगळुरुकडून खेळताना पाच हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही नोंदवला. कोहलीने 62 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 92 धावा केल्या.

बंगळुरुने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. बंगळुरुचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने पहिल्या दोन चेंडूंत मुंबईला सलग दोन धक्के दिले. पण सलामीवीर इव्हिन लुईस आणि रोहित शर्मा यांनी दमदार फटकेबाजी करत तिसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. लुईसने 42 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 65 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. लुईस बाद झाल्यावरही रोहितने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. रोहितने 52 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर खणखणीत 94 धावांची खेळी साकारली.

 

11.47 PM : मुंबईचा बंगळुरुवर 46 धावांनी विजय, गुणांचे खाते उघडले

11.40 :  बंगळुरुचा आठवा फलंदाज उमेश यादव बाद

11.32 PM : ख्रिस वोक्स बाद, बंगळुरुला सातवा धक्का

11.22 PM : कोहलीच्या बंगळुरुकडून खेळताना पाच हजार धावा पूर्ण

- मुंबईविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत कोहलीने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. कोहलीने यावेळी बंगळुरुकडून खेळताना पाच हजार धावा पूर्ण केल्या.

11.21 PM : विराट कोहलीचे अर्धशतक

- कोहलीने 41 चेंडूंत यावेळी अर्धशतक पूर्ण केले.

11.18 PM : सर्फराज खान बाद; बंगळुरुला सहावा धक्का

- मुंबईचा फिरकीपटू मयांक मार्कंडेने सर्फराझला यष्टीरक्षक आदित्य तरेकरवी झेलबाद केले. 

11.10 PM : यष्टीरक्षक इशान किशन जखमी; आदित्य तरे करणार यष्टीरक्षण

- हार्दिक पंड्याने फेकलेला एक चेंडू थेट यष्टीरक्षक  इशान किशनच्या चेहऱ्यावर लागला. ही दुखापत गंभीर असल्याने इशानला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याजागी आदित्य तरेने यष्टीरक्षकाची जबाबदारी स्वीकारली.

11.00 PM : बंगळुरुला पाचवा धक्का, वॉशिंग्टन सुंदर बाद

- फिरकीपटू कृणाल पंड्याने वॉशिंग्टन सुंदर बाद बंगळुरुला पाचवा धक्का दिला.

10.55 PM : बंगळुरु 10 षटकांत 4 बाद 76

10.54 PM : बंगळुरुला सलग दोन धक्के; मनदीप आणि अँडरसन OUT

- मुंबईचा फिरकीपटू कृणाल पंड्याने दहाव्या षटकात मनदीप सिंग आणि कोरे अँडरसन यांनी सलग चेंडूंवर बाद केले.

10.40 PM : बंगळुरु 5 षटकांत 2 बाद 44

10.30 PM :  बंगळुरुला हादरा; एबी डी'व्हिलियर्स बाद

- मॅक्लेघनने आपल्या चौथ्याच षटकात डी'व्हिलियर्सला बाद केले आणि बंगळुरुला हादरा बसला.

10.26 PM : बंगळुरुला पहिला धक्का; डी'कॉक बाद

- मुंबईचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेघनने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डी'कॉकला बाद करत बंगळुरुला पहिला धक्का दिला.

22.19 PM : विराट कोहलीची बंगळुरुसाठी दमदार सुरुवात

मुंबई : मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर रो'हिट' शो पाहायला मिळाला. रोहितच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात 213 अशी विशाल धावसंख्या उभारली.

बंगळुरुने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. बंगळुरुचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने पहिल्या दोन चेंडूंत मुंबईला सलग दोन धक्के दिले. पण सलामीवीर इव्हिन लुईस आणि रोहित शर्मा यांनी दमदार फटकेबाजी करत तिसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. लुईसने 42 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 65 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. लुईस बाद झाल्यावरही रोहितने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. रोहितने 52 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर खणखणीत 94 धावांची खेळी साकारली.

9.52 PM : मुंबईचे बंगळुरुपुढे 214 धावांचे आव्हान

9.51 PM : रोहित शर्मा OUT; मुंबईला सहावा धक्का

- रोहित शतक झळकावणार असे वाटत होते, पण मोठा फटका मारताना तो बाद झाला. रोहितने 52 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर खणखणीत 94 धावांची खेळी साकारली.

9.48 PM : मुंबईच्या दोनशे धावा पूर्ण, रोहितचा स्पर्धेतील दोनशेवा षटकार

- रोहितने या सामन्यात षटकार लगावत दोनशे धावा पूर्ण केल्या. हा स्पर्धेतील दोनशेवा षटकार ठरला.

9.44 PM :  हार्दिक पंड्याचे सलग दोन षटकार

- पहिल्या चेंडूवर हार्दिकला बाद दिले होते. पण पंड्याने रीव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये तो नाबाद ठरला. त्यानंतरच्याच सलग दोन चेंडूंवर पंड्याने षचकार ठोकले.

9.40 PM : कायरन पोलार्ड OUT; मुंबईला पाचवा धक्का

9. 22 PM : मुंबईला चौथा धक्का; कृणाल पंड्या OUT

- मुंबईच्या कृणाल पंड्याने धावचीत होत आत्मघात केला. पंंड्याने 12 चेंडूंत 15 धावा केल्या.

9.20 PM : मुंबई 15 षटकांत 3 बाद 143

9.15 PM:  रोहित शर्माचे अर्धशतक

- रोहित शर्माचे अर्धशतक, 33 चेंडूत पूर्ण केले अर्धशतक, मुंबईची मोठ्या धावसंख्येकडे कूच.

8.58 PM :  मुंबईला तिसरा धक्का; लुईस OUT

- कोरे अँडरसनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा नादा लुईस बाद झाला. लुईसने 42 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 65 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

8.54 PM :  लुईसचे खणखणीत सलग दोन चौकार

- सलामीवीर लुईसने युजवेंद्र चहलच्या अकराव्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन सलग षटकार लगावले.

8.50 PM : मुंबई दहा षटकांत 2 बाद 95

8.48 PM : रोहितचे सलग दोन चौकार

- कोरे अँडरसनच्या दहाव्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर रोहितने दमदार चौकार लगावले.

8.42 PM : षटकाराच्या जोरावर लुईसचे अर्धशतक

- युजवेंद्र चहलच्या नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर लुईसने षटकार लगावत दिमाखात अर्धशतक पूर्ण केले.

8.36 PM :SIX... रोहित शर्माचा उत्तुंग षटकार

- वॉशिंग्टन सुंदरच्या आठव्या चेंडूच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने षटकार मारत चाहत्यांची मने जिंकली.

8.26 PM : लुईस आणि रोहितने मुंबईचा डाव सावरला; 5 षटकांत 2 बाद 56

- मुंबईला पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन धक्के बसले होते. पण सलामीवीर लुईस आणि रोहित यांनी मुंबईला या धक्क्यातून बाहेर काढले. या दोघांच्या फटकेबाजीमुळे मुंबईने पाच षटकांत 56  धावांची लूट केली.

8.25 PM : रोहित आणि लुईसची अर्धशतकी भागीदारी

8.23 PM :  बंगळुरुच्या सिराज खानचे षटकाराने स्वागत

- मुंबईचा सलामीवीर लुईसने बंगळुरुचा वेगवान गोलंदाज सिराजच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला.

8.19 PM : वॉशिंग्टन सुंदरच्या चौथ्या षटकात चार चौकार

- वॉशिंग्टन सुंदरच्या चौथ्या षटकात मुंबईने एकूण 19 धावांच लूट केली, यामध्ये चार चौकारांचा समावेश होता.

8.09 PM : इव्हिन लुईसचा मुंबईसाठी पहिला षटकार

- ख्रिस वोक्सच्या दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुंबईचा सलामीवीर लुईसने पहिला षटकार खेचला.

8.06 PM : रोहित शर्माचा मुंबईसाठी पहिला चौकार

- रोहितने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. मुंबईसाठी हा पहिला चौकार ठरला.

8.04 PM : उमेश यादवची हॅटट्रिक हुकली

- दोन चेंडूंत दोन बळी मिळवल्या उमेश यादव या हंगामातली पहिली हॅटट्रिक मिळवतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण रोहितने तिसरा चेंडू सावधपणे खेळून काढला.

8.01 PM : मुंबईला दुसऱ्या चेंडूवर दुसरा धक्का; इशान किशन  OUT

- उमेशने दुसऱ्या चेंडूवरही मुंबईला धक्का दिला. उमेशने इशान किशनला शून्यावर त्रिफळाचीत केले.

8.00 PM : मुंबईला पहिल्याच चेंडूवर धक्का; सूर्यकुमार यादव OUT

- सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईला धक्का बसला. बंगळुरुचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सूर्यकुमार यादवला त्रिफळाचीत केले.

7.45 PM : रोहित शर्मा चौथ्या स्थानावर फलंदाजीला येण्याची शक्यता

- संघाची फलंदाजी बळकट व्हावी म्हणून रोहित शर्माने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या जागी सूर्यकुमार यादव सलामीला येऊ शकतो.

7.40 PM : बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली

मुंबईची अग्निपरीक्षा; वानखेडेवर बंगळुरुविरुद्ध सामना
मुंबई : आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात मुंबईची अग्निपरीक्षा असेल. कारण घरच्या वानखेडेच्या मैदानावर मुंबईपुढे आव्हान असेल ते विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे. त्यामुळे या सामन्यात रोहित आणि विराट या दोघांच्याही नेतृत्वाचा कस लागणार आहे.

 

मुंबईने हा सामना जिंकला तर त्यांना पहिला गुण कमावता येईल, त्याचबरोबर त्यांना आठव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर जाता येऊ शकते. दुसरीकडे हा सामना जिंकल्यावर बंगळुरुचे चार गुण होतील आणि त्यांनाही पाचवे स्थान पटकावता येऊ शकते. त्यामुळे कोणता संघ हा सामना जिंकून पाचव्या स्थानावर जातो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

दोन्ही संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जयप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्ताफिझूर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, इशान किशन, राहुल चहर, इव्हिन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जेपी ड्युमिनी, तजींदर सिंग, शरद लुम्बा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, अकिला धनंजया, अनुकूल रॉय, मोहसिन खान, एमडी निधीश, मिचेल मॅक्लेघन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु :  विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्स, युजवेंद्र चहल, उमेश यादव,  ब्रेंडन मॅक्कुलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्विंटन डी कॉक, मोहम्मद सिराज, कोरे अँडरसन, कॉलिन डी ग्रांडहोम, मुरुगन अश्विन, पार्थिव पटेल, मोइन अली, मनदीप सिंह, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साउदी, कुलवंत खेजोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे, अनिरुद्ध अशोक जोशी. 

मुंबईने हा सामना जिंकला तर त्यांना पहिला गुण कमावता येईल, त्याचबरोबर त्यांना आठव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर जाता येऊ शकते. दुसरीकडे हा सामना जिंकल्यावर बंगळुरुचे चार गुण होतील आणि त्यांनाही पाचवे स्थान पटकावता येऊ शकते. त्यामुळे कोणता संघ हा सामना जिंकून पाचव्या स्थानावर जातो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

Web Title: MI vs RCB, IPL 2018 LIVE: Rohit Sharma likely to bat in fourth position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.