मुंबई : विक्रमांचा नवा ‘बादशाह’, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद दहा हजार धावांची नोंद केली. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन डेत त्याने हा मान स्वत:च्या शिरपेचात रोवला. दहा हजार धावा काढणारा भारताचा तो पाचवा तर जगातील १३ वा फलंदाज बनला. मात्र त्याने सर्वात जलद हा पल्ला सर केला. त्याच्या या वेगावर मुंबई पोलिसांनी गमतीदार पोस्ट केली.
२१२ व्या वन डेतील २०५ व्या डावात त्याने ही कामगिरी करीत सर्वांत कमी खेळींमध्ये अशी किमया साधण्याचा मान पटकविला.
याआधीचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. त्याने २५९ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. सौरव गांगुली (२६३ डाव), रिकी पाँटिंग (२६६), जॅक कालिस (२७२), महेंद्रसिंग धोनी (२७३) व ब्रायन लारा (२७८) यांनी दहा हजार धावांचा विक्रम केला आहे.
यावर मुंबई पोलिसांनी लिहिले की," विराट कोहलीच्या या वेगासाठी आम्ही कोणतेही चलान फाडणार नाही. तु असाच खेळत रहा आणि आमच्याकडून तुला शुभेच्छा."
मुंबई पोलिसांच्या या क्रिएटिव्हीटीचेही कौतुक झाले.
Web Title: Mumbai Police congratulate Virat Kohli for his 10000 ODI runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.