नवी दिल्ली - नुकतेच विवाहबंधनात अडकलेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी नवविवाहित जोडप्याने पंतप्रधानांचे आशीर्वाद घेतले. तर मोदींनीही विराट आणि अनुष्काला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह 11 डिसेंबर रोजी इटलीमध्ये झाला होता. दरम्यान, लग्न आणि हनिमूननंतर विराट आणि अनुष्का भारतात परतले असून, काल त्यांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला होता. त्यानंतर आज विराट आणि अनुष्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी आयोजित केलेल्या रिसेप्शन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
आता विराट आणि अनुष्काच्या विवाहानिमित्त रिसेप्शन सोहळा 21 डिसेंबर रोजी दिल्लीत आणि 26 डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे. मंगळवारी दिल्लीत आल्यानंतर नवविवाहित जोडप्याने 21 डिसेंबरला होणाऱ्या रिसेप्शनची जोरदार तयारी केली आहे. विरूष्काच्या लग्नाचे दोन ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहेत. दिल्लीत 21 डिसेंबरला व मुंबईत 26 डिसेंबरला रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड व क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज या रिसेप्शनला हजर राहतील. दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे रिसेप्शन होईल. तर २६ तारखेला मुंबईतील अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोन्ही निमंत्रण पत्रिकांची थीम पर्यावरणाशी निगडीत आहेत.
11 डिसेंबर रोजी विराट आणि अनुष्का विवाहबंधनात अडकले होते. इटलीच्या बोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये दोघांचे लग्न झाले. हे हाॅटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीचं हाॅटेल म्हणूनही ओळखले जाते. जगातल्या 20 महागड्या हाॅटेल्सपैकी ते एक आहे. स्वतः विराट आणि अनुष्काने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली होती.
Web Title: Newly-married Virat Kohli and Anushka Sharma's visit to Prime Minister Narendra Modi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.