IPL 2024 , Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Marathi : वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी यजमान मुंबई इंडियन्सची अवस्था ४ बाद २० अशी केली होती आणि नंतर तो सामना सहज जिंकलाही होता. त्याचा वचपा काढण्याच्या निर्धाराने मुंबईचा संघ जयपूरच्या मैदानावर उतरेल असे वाटले होते. पण, RR ने घरच्या मैदानावरही वर्चस्व गाजवले. रोहित शर्माने पहिल्याच षटकात घाई केली आणि ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात विकेटची परंपरा कायम राखून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. संदीप शर्माने दोन धक्के देताना मुंबईची अवस्था ३ बाद २० अशी केली.
MI ला २०१२ पासून जयपूरमध्ये RR वर विजय मिळवता आलेला नाही. हार्दिक पांड्याचा हा मुंबई इंडियन्सकडून १००वा आयपीएल सामना आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आकाश मढवाल, रोमारियो शेफर्ड व श्रेयस गोपाळ यांना आज प्लेइंग इलेव्हनमधून विश्रांती दिली गेली आहे. यांच्याजागी नुवान तुशारा, नेहाल वधेरा व पियुष चावला यांना संधी मिळाली आहे. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले. रोहितने टोलवलेला चेंडू जागच्याजागी उंच उडाला आणि संजू सॅमसनने सुरेख झेल टिपला. आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक २६ विकेट्सचा विक्रम बोल्टने नावावर करताना भुवनेश्वर कुमारला ( २५) बाद केले. वानखेडे स्टेडियमवरही मुंबईचे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरलेले.
सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर MI च्या आशा होत्या आणि सूर्याने नेहमीप्रेमाणे काही अनपेक्षित फटके खेचले. संदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात सूर्यकुमारला ( १०) माघारी पाठवून मुंबईची अवस्था ३ बाद २० धावा अशी केली.
Web Title: IPL 2024 , Rajasthan Royals vs Mumbai Indians Live : Mumbai Indians are 20/3 after 3.1 overs , TRENT BOULT HAS TAKEN MOST WICKETS IN IPL HISTORY IN THE OPENING OVER, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.