बंगळुरु: भारतीय संघाचे मायदेशातील यश विदेशातही कायम राहिल्यास सध्याचा वन डे संघ सर्वांत बलाढ्य बनू शकेल, असे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सध्याच्या संघात सर्वोत्कृष्ट वन डे संघ बनण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर कोहलीने मत मांडले.
काल चौथ्या वन डेत भारतीय संघ २० धावांनी पराभूत होताच विजयाची मालिका खंडित झाली. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना कोहली म्हणाला,‘गावस्कर यांनी आमचे कौतुक करणे लौकिकास्पद आहे. मागील काही वर्षांत त्यांनी भारताच्या अनेक संघांची कामगिरी अगदी जवळून पाहिली आहे. सध्याचा संघ फार युवा आहे. मायदेशात फार चांगला खेळ होऊ शकला पण यशाची पुनरावृत्ती विदेशात झाल्यास यशाचे अधिक समाधान लाभणार आहे.’
आॅस्ट्रेलियाने गुरुवारी विजय नोंदवित भारताची सलग नऊ विजयाची मोहीम रोखली. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने पुढे असून पाचवा आणि अखेरचा सामना नागपुरात रविवारी होईल.
कामगिरीत सातत्य राखून पाठोपाठ सामने जिंकण्याचे कसब पुन्हा पुन्हा करणे आपल्याला आवडेल, असे सांगून कोहली पुढे म्हणाला,‘राखीव बाकावर बसलेल्यांना संधी देण्यात काहीही गैर नव्हते. याचा लाभ झाला नाही ही बाब वेगळी.’ भारताने भुवनेश्वर आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देत मोहम्मद शमी तसेच उमेश यादव यांना खेळविले. यावर कोहली म्हणाला,‘ आम्ही मालिका जिंकली असल्याने सर्वच खेळाडूंना केव्हा ना केव्हातरी संधी द्यावीच लागेल. राखीव बाकावरील ताकद अजमावण्यासाठी त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. उमेशने चांगला मारा केला. शमीची गोलंदाजीही चांगलीच होती.’
एक दिवस खराब खेळल्याने पराभव झाला
‘चौथ्या एकदिवसीय सामन्यात आॅस्टेÑलियाविरुध्द आम्ही चांगली कामगिरी करु शकलो असतो. पण एक दिवस खराब खेळ केल्याने हा पराभव झाला,’ भारताचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले.
- सामना संपल्यानंतर कोहलीने सांगितले की, ‘आम्ही ३० षटकांपर्यंत सामन्यात आव्हान टिकवून होतो. माझ्यामते आम्ही आॅस्टेÑलियाला ३५०च्या आत रोखले, तर चांगले ठरेल आणि आम्ही तसेच केले. धावांचा पाठलाग करताना आमची सुरुवात चांगली झाली पण सलामी भागीदारीनंतर आम्हाला आणखी एक चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. असे क्रिकेटमध्ये होत असते. खूप दिवसांनी एक दिवस आपला नसतो.’
-‘उमेश यादव आणि मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी
केली. फिरकीपटूंसाठी नेहमीच चांगले दिवस नसतात. आॅस्टेÑलियाने खूप चांगला खेळ केला. आम्ही इतकेही खराब खेळलो नाही, पण आॅसीचा खेळ उत्कृष्ट होता,’ असेही कोहली यावेळी म्हणाला.
भारत-आॅस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील नंबर गेम...
- आतापर्यंत मालिकेत सर्वाधिक धावा भारताच्या हार्दिक पांड्याने (२२२) फटकावलेल्या असून यामध्ये त्याने २ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्यानंतर आॅस्टेÑलियाच्या अॅरोन फिंच (२१८) आणि डेव्हीड वॉर्नर (१९२) यांचा क्रमांक आहे.
- गोलंदाजीमध्ये आॅस्टेÑलियाच्या नॅथन कुल्टर - नाइल याने छाप पाडली असून त्याने ४ सामन्यांतून २०९ धावांच्या मोबदल्यात ९ बळी घेतला. यानंतर आॅसीच्याच केन रिचर्डसन (१५८/७) आणि भारताच्या कुलदीप यादव (१६२/७) यांचा क्रमांक आहे.
Web Title: Only the success of the series should be done abroad, only the team can become the strongest - Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.