आयर्लंडवर मात

अजिंक्य रहाणे ३३ धावांवर नाबाद राहिला.

विराट कोहली ४४ धावांवर नाबाद राहिला.

उमेश यादव जॉर्ज डॉकरेलला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना.

केविन ओब्रायनला बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना टीम इंडिया.

भारताचा जलदगती गोलंदाज मोहीत शर्मा. मोहितने ३८ धावा देत १ गडी बाद केला.

रोहीत शर्मानेही ऑफ स्पिन गोलंदाजी केली.

आयर्लंडच्या निआल ओब्रायनने ७५ धावा करत आयर्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली.

मोहम्मद शामीने ४१ धावांमध्ये ३ गडी बाद करत आयर्लंडच्या फलंदाजांना वेसण घातली.

आयर्लंडचा विल्यम पोर्टरफिल्ड एक फटका लगावताना. सलामीचा फलंदाज असलेल्या पोर्टरफिल्डने ६७ धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली.

सलामीला आलेल्या रोहीत शर्माने ६४ धावा करत शिखर धवनला मोलाची साथ दिली.

भारताने आयर्लंडचा ८ गडी राखून साखळी सामन्यात पराभव केला. या विजयाचा शिल्पकार होता शतक झळकावणारा शिखर धवन. आयर्लंडला २५९ धावांवर रोखल्यानंतर भारताने या धावा २ गडी गमावत अवघ्या ३६.५ षटकांमध्ये केल्या.