द्विशतकाचे मानकरी

इंदोरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १४९ चेंडूंमध्ये २१९ धावा करत विरेंद्र सेहवाग द्विशतकाच्या मानक-यांमध्ये बसला. सेहवागने २५ चौकार व सात षटकार लगावले होते.

दोन द्विशतकं झळकावण्याचा व सर्वाधिक धावा करण्याचा मान जातो भारताच्याच रोहीत शर्माला. त्याने कोलकात्याला श्रीलंकेविरुद्ध १७३ चेंडूंमध्ये तब्बल २६४ धावा काढल्या ज्यात ३३ चौकार व ९ षटकार होते. दुसरं द्विशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध काढताना रोहीतने बेंगळूर येथे २०९ धावा केल्या.

वर्ल्ड कपमधलं पहिलं तसेच पहिलं गैरभारतीय म्हणता येईल असं द्विशतक वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं झिम्बाब्वे विरुद्ध २४ फेब्रुवारी २०१५ रोजी तडकावलं. गेलने १० चौकार व तब्बल १६ षटकार ठोकत १४७ चेंडूंमध्ये २१५ धावा काढल्या. विशेष म्हणजे गेलने १०० धावा करायला १०५ चेंडू घेतले परंतु पुढच्या ११९ धावा त्याने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये केल्या.

एकदिवसीय सामन्यांमधलं पहिलं द्विशतक झळकावण्याचा विक्रम आहे सचिन तेंडुलकरच्या नावावर. ग्वाल्हेरमध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २४ फेब्रुवारी २०१० रोजी १४७ चेंडूंमध्ये ठोकलेल्या द्विशतकात २५ चौकारांचा व तीन षटकारांचा समावेश आहे. सचिन २० धावांवर नाबाद राहिला होता.