मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाच्या क्षमतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात मुख्य प्रशिक्षक आणि त्यांचा सहयोगी स्टाफही टीकेच्या केंद्रस्थानी आहेत. रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक स्टाफचा करार वर्ल्ड कपनंतर संपुष्टात आला आहे, फक्त त्यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मंगळवारी मुख्य प्रशिक्षकांसह अन्य महत्त्वांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नियमानुसार शास्त्रीसह सध्या कार्यरत असलेले साहाय्यक स्टाफही पुन्हा अर्ज करू शकतात. पण, शास्त्रींची निवड न झाल्यास कोण असू शकतो भारतीय संघाचा पुढचा प्रशिक्षक ?
बीसीसीआयमध्ये मेगाभरती; मुख्य प्रशिक्षकासह महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी
टॉम मूडीः विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला उंचीवर नेण्याची क्षमता टॉम मूडी यांच्याकडे आहे. ते इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायजर्स हैदराबादचे ( 2012 पासून) प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादनं 2015मध्ये जेतेपद पटकावले होते.
वीरेंद्र सेहवागः भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हाही या पदाकरिता इच्छुक आहे. अनिल कुंबळे यांनी पदभार सोडल्यानंतर सेहवागच्या नावाची चर्चा झाली होती. त्यामुळे यावेळी तो त्याचं नशीब आजमावू शकतो. 2016 पासून तो आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा मेंटॉर आहे. त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला नक्की फायदा होईल.
ट्रॅव्हर बायलीसः इंग्लंड संघाचे सध्याचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बायलीस यांच्या करारात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्यांच्यापेक्षा योग्य पर्याय मिळूच शकत नाही. त्यांनी 2015 मध्ये इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानासह पहिलेवहिले वर्ल्ड कप जेतेपदही पटकावले.
गॅरी कर्स्टनः 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन पुन्हा एकदा या जबाबदारीसाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी अर्जही केला आहे. पण, त्यांच वेळी त्यांनी दक्षिण आफ्रिका संघालाही मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुढील वर्ल्ड कप हा भारतात होणार आहे आणि कर्स्टन पुन्हा एकदा टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी उत्सुक आहेत.
महेला जयवर्धनेः महेला जयवर्धनेने श्रीलंकेच्या संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत मार्गदर्शन करण्यास नकार दिला होता. गेली तीन वर्ष तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससोबत काम करत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने दोन जेतेपद जिंकली आहेत. त्याचा अनुभव, फलंदाजांना समजून घेण्याचे आणि तणावाची परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य संघाच्या फायद्याचे ठरणारे आहे.
Web Title: Ravi Shastri's replacement: Former players who can become Indian cricket team's next head coach
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.