टीम इंडियाच्या शिलेदारांचे रिपोर्ट कार्ड

कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही यजमान श्रीलंकेला व्हाईटवॉश देत टीम इंडियाने आपला एकहाती दबदबा राखला. संपुर्ण मालिकेत लंकेने क्वचितंच भारतीय संघापुढे आव्हान उभे केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 02:11 AM2017-09-05T02:11:34+5:302017-09-05T06:53:00+5:30

whatsapp join usJoin us
 Report card of team India crematorium | टीम इंडियाच्या शिलेदारांचे रिपोर्ट कार्ड

टीम इंडियाच्या शिलेदारांचे रिपोर्ट कार्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही यजमान श्रीलंकेला व्हाईटवॉश देत टीम इंडियाने आपला एकहाती दबदबा राखला. संपुर्ण मालिकेत लंकेने क्वचितंच भारतीय संघापुढे आव्हान उभे केले. त्याचवेळी भारताने आपल्या मजबूत फलंदाजीसह गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही वर्चस्व राखताना श्रीलंकेला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
एकदिवसीय मालिकेबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी आपआपल्या परीने संघाच्या विजयामध्ये योगदान दिले. कर्णधार विराट कोहलीपासून नवख्या शार्दुल ठाकूर पर्यंत सर्वांनीच मिळालेल्या संधीचे सोने करताना आपली छाप पाडली. आपल्या कामगिरीत सुधारणा करताना आयसीसी क्रमवारीतही भारतीय खेळाडूंनी मोठी झेप घेतली. तसेच, आगामी आॅस्टेÑलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड अशा प्रमुख परदेशी दौºयासाठी संघातील खेळाडूंना आजमावून घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्नही श्रीलंका दौºयातून यशस्वी ठरला. तरी, चाहते आपल्या आवडत्या खेळाडंूच्या कामगिरीचे विश्लेषण आपआपल्या परीने करीतंच असतात. मात्र, जेष्ठ क्रिकेटतज्ज्ञ आणि ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन यांनी टीम इंडियातील सर्व शिलेदारांचे दहापैकी गुण देऊन विशेष विश्लेषण केले आहे.

(जेष्ठ क्रिकेटतज्ज्ञ अयाझ मेमन यांनी केलेले विश्लेषण)

विराट कोहली (गुण- दहा पैकी 9.5) : वन-डे मालिकेत सर्वाधिक धावा फटकावताना कोहलीने २ शतकी खेळी केल्या. तसेच, यादरम्यान त्याने कारकिर्दीत ३०वे शतक नोंदवले. यावरुन तो फलंदाजीचा बादशाह असल्याचे सिध्द झाले. पण, कर्णधार म्हणून त्याचे योगदान जबरदस्त राहिले. निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी लंकेवरील दडपण जराही कमी होऊ दिले नाही.

महेंद्रसिंह धोनी : (गुण- दहा पैकी 9) अत्यंत कठोर टीका झाल्यानंतर धोनीने या मालिकेतून शानदार खेळ करत सर्वांची तोंडे गप्प केले. मालिकेत एकदाही बाद न होता त्याने दोन वेळा संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तसेच, यष्टींमागे आपले वर्चस्वही कायम राखले. शिवाय, डीआरएस प्रणालीमधील आपली अचूकताही त्याने सिध्द केली.

रोहित शर्मा (गुण- दहा पैकी 8) : एकदिवसीय मालिकेत कोहलीनंतर ३०० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज. रोहितची मोहक फलंदाजी पाहणे कायम आनंददायी असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने अतिउत्साहीपणाला आवर घालताना संयम आणि आक्रमकतेचा योग्य संगम घालताना जबरदस्त फलंदाजी केली.

शार्दुल ठाकूर : (गुण- दहा पैकी 3) आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या शार्दुलने चांगली वेगवान गोलंदाजी केली. परंतु, गोलंदाजीत असलेल्या अचूकतेच्या अभावामुळे त्याला फटकेही बसले. त्याला पुढे आणखी संधी नक्कीच मिळतील, पण त्या संधी साधून निवडकर्त्यांचे आणि संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधणे हे त्याच्यापुढे आव्हान असेल.

के. एल. राहुल : (गुण- दहा पैकी 1) कसोटी मालिकेतील चांगला फॉर्म एकदिवसीय मालिकेत कायम राखण्यात राहुल अपयशी ठरला. चार सामन्यांतून केवळ २८ धावा, हीच कामगिरी भारताच्या दृष्टीने अपयशाची ठरली. पुढील काळात संघातील स्थान पक्के करण्यासाठी लवकरंच राहुलला मोठी खेळी आवश्यक आहे.

केदार जाधव :(गुण- दहा पैकी 6) गेल्या मोसमातील शानदार फॉर्म संथ खेळपट्टीवर कायम राखण्यात केदार अपयशी ठरला. तरी, त्याने अखेरच्या सामन्यात चांगली अर्धशतकी खेळी केली. एक बदली गोलंदाज म्हणून तो फायदेशीर ठरत आहे.

शिखर धवन :(गुण- दहा पैकी 7) एकदिवसीय मालिकेत धवनचा फॉर्म अस्थिर राहिला. परंतु, पहिल्या सामन्यात त्याने झळकावलेले शतक शानदार होते. एकूणच, लंका दौºयातील अप्रतिम कामगिरीनंतर धवनला वगळणे निवडकर्त्यांसाठी कठीण गेले.

अजिंक्य रहाणे :(गुण- दहा पैकी 2) चांगल्या कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात रहाणेला संधी मिळाली. मात्र, तो अपयशी ठरला. जेव्हा संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते तेव्हा अशी सुमार कामगिरी महागात पडू शकते.

हार्दिक पांड्या :(गुण- दहा पैकी 6.5) आकडेवारी हार्दिकचे यश मोठे असल्याचे सांगणार नाही. पण, त्याचा छोटेखानी अनुभव पाहता, त्याची फलंदाजीतील व गोलंदाजीतील कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील असल्याचे नक्कीच जाणवेल.

अक्षर पटेल :(गुण- दहा पैकी 6.5) अनुभवी रविंद्र जडेजाच्या जागी खेळताना अक्षरने चांगली कामगिरी केली. सहा बळी घेताना त्याने चांगली गोलंदाजी केली. परंतु, अष्टपैलू छाप पाडण्यासाठी त्याला फलंदाजीत आणखी मेहनत घ्यावी लागेल.

यजुर्वेंद्र चहल :(गुण- दहा पैकी 6.5) चहलने मोक्याच्यावेळी बळी घेतले. तो अव्वल फलंदाजांनाविरुद्धची चेंडूंना उसळी द्यायला घाबरत नाही. त्याला केवळ दोन सामने खेळायला मिळाले, परंतु त्यात त्याने बºयापैकी त्याने छाप पाडली.

कुलदीप यादव :(गुण- दहा पैकी 7) चायनामन शैली असलेला हा डावखुरा लेगस्पिनर आपल्या शैलीने फलंदाजांना गोंधळून टाकतो. कुलदीपने मिळालेल्या दोन सामन्यांमध्ये आपली चमक दाखवण्यात यश मिळवले.

भुवनेश्वर कुमार : (गुण- दहा पैकी 8)अखेरच्या सामन्यात ५ बळी मिळवण्यापूर्वी एकदिवसीय मालिकेत भुवीला एकही बळी मिळाला नव्हता. पण, असे असले तरी फलंदाजांना त्याने जखडवून ठेवण्यात यश मिळवले. मालिकेत त्याने अर्धशतक झळकावून संघाला शानदार विजयही मिळवून दिला.

जसप्रीत बुमराह :(गुण- दहा पैकी 9) एकदिवसीय मालिकेत जबरदस्त धावगतीने तब्बल १५ बळी घेतले. आपल्या अत्यंत वेगळ्या शैलीसह जबरदस्त नियंत्रण आणि विविधतेच्या जोरावर तो फलंदाजांवर नियंत्रण राखतो. संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून तो वेगाने प्रगती करत आहे.

मनीष पांड्ये :(गुण- दहा पैकी 7) पांड्येला मर्यादित संधी मिळाली, पण त्याने मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा घेतला. सध्या संघात मधल्या फळीत जागा मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. त्याने आशा उंचावल्या असून स्पर्धेत क्षेत्ररक्षणही जबरदस्त केले.

 

 

Web Title:  Report card of team India crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.