मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कान टोचण्याची एकही संधी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर दवडत नाही. इंडियन प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर गंभीरने कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. सोमवारी पुन्हा एकदा त्याने कॅप्टन कोहलीवर निशाणा साधला. कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. पण,कर्णधार म्हणून त्याला रोहिल शर्माने तगडे आव्हान उभे केले आहे, असे मत व्यक्त करून त्याने कोहलीचे टेंशन वाढवले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्येही कोहलीच्या RCB ला गुणतालिकेत तळावर समाधान मानावे लागले. त्यावरून गंभीरने कोहलीवर टीका केली होती. ''कोहली इतका नशीबवान खेळाडू दुसरा कोणी नसेल. सातत्याने अपयशी ठरूनही RCB ने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलेले नाही,'' असा टोमणा त्याने मारला होता. आता रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावल्यानंतर गंभीरने पुन्हा कोहलीला धोक्याचा इशारा दिला आहे.
तो म्हणाला," रोहितच्या नावावर चार आयपीएल जेतेपद आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नावावर तीन, परंतु कोहलीच्या नावावर एकही नाही. रोहितने कर्णधार म्हणून स्वत:ला सिध्द केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ कोहलीच्या अनुपस्थितीतील पर्याय म्हणून पाहू नका. रोहितने आता सर्वोच्च शिखर गाठले आहे आणि भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी तो तगडा पर्याय ठरू शकतो. फलंदाज म्हणून विराट ग्रेट आहे, पण कर्णधार म्हणून रोहित वरचढ ठरतो."
विराट कोहलीला सल्ला...
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गरज पडल्यास विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते. त्यावर गंभीरने नाराजी प्रकट केली. कोहलीने तिसऱ्या क्रमंकावर खेळावे. फलंदाजीचा क्रम बदलून खेळावर परिणाम करून घेऊ नये. चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे, असा सल्ला त्याने दिला.
Web Title: Rohit sharma is a one step ahead of Virat Kohli as a captain, say Gautam Gambhir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.