कोलकाता : क्रिकेट खेळताना डोक्याला बॅट लागून खेळाडूचा मृत्यू झाला आहे. 23 एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कल्याणी इथे खेळताना बॅट लागल्यामुळं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. फलंदाजी करताना फटका मारणाऱ्या खेळाडूची बॅट विकेटमागे असलेल्या कीपरच्या डोक्यात लागल्याने क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे.
कौशिक आचार्य असं या दुर्दैवी 19 वर्षीय विकेट कीपरचं नाव आहे. तो पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा रहिवाशी होता. कौशिक हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होता. एका सराव सामन्यादरम्यान तो विकेटकिपिंग करत होता. त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने विकेटमागे जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचदरम्यान विकेट कीपर असलेल्या कौशिक आचार्यने तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, फलंदाजाने फिरवलेली बॅट, जोरात कौशिकच्या डोक्यात लागली. या मारामुळे कौशिक जबर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या जेएनएम रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तीन वर्षापूर्वी कोलकाताच्या ईस्ट बंगाल क्लबचा क्रिकेटपटू अंकित केशरी खेळताना मृत्यू झाला होता. बंगाल क्रिकेट संघाच्या वनडे नॉकआऊट सामन्यादरम्यान कॅच घेण्याचा प्रयत्न करताना दुसऱ्या खेळडुची टक्कर लागल्याने अंकितचा मृ्त्यू झाला होता.
Web Title: student dies after being hit by cricket bat in bengal tspo
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.