IPL 2024 SRH vs MI: ऐतिहासिक! हैदराबादचं 'हेड' चाललं; मुंबईची धुलाई, धावांचा पाऊस

IPL 2024 SRH vs MI Live: ट्रॅव्हिस हेडच्या वादळाने मुंबईची चांगलीच धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 08:09 PM2024-03-27T20:09:45+5:302024-03-27T20:09:55+5:30

whatsapp join usJoin us
Sunrisers Hyderabad's Travis Head scored 50 runs off 18 balls with the help of 2 sixes and 9 fours | IPL 2024 SRH vs MI: ऐतिहासिक! हैदराबादचं 'हेड' चाललं; मुंबईची धुलाई, धावांचा पाऊस

IPL 2024 SRH vs MI: ऐतिहासिक! हैदराबादचं 'हेड' चाललं; मुंबईची धुलाई, धावांचा पाऊस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 SRH vs MI Live Updates In Marathi | हैदराबाद: आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. यजमान संघात ट्रॅव्हिस हेड आणि जयदेव उनाडकट यांची एन्ट्री झाली आहे. तर मुंबईच्या संघात ल्यूक वुडच्या जागी Kwena Maphaka ला संधी मिळाली आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या यजमानांनी मुंबईची चांगलीच धुलाई केली. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या १८ चेंडूत ५० धावा करून ऐतिहासिक खेळी केली. हैदराबादकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो खेळाडू ठरला आहे. हैदराबादने पहिल्या ७ षटकांतच १०० धावांचा आकडा गाठला.

मयंक अग्रवाल स्वस्तात परतल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने स्फोटक खेळी करून मुंबईची डोकेदुखी वाढवली. त्याने २४ चेंडूत ६२ धावा कुटल्या. हेडच्या खेळीत ३ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश राहिला. घातक वाटणाऱ्या हेडला बाद करण्यात गेराल्ड कोएत्झीला यश आले. हेडला अभिषेक शर्माने चांगली साथ अन् तो अद्याप खेळपट्टीवर टिकून आहे. जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता हेडने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने १७ वर्षीय क्वेना महाकाच्या एकाच षटकात २ षटकार आणि २ चौकार लगावले.  

आजच्या सामन्यासाठी हैदराबादचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड,  भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि जयदेव उनाडकट. 

आजच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित  शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नमन धीर, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, शम्स मुलाणी, क्वेना महाका.

Web Title: Sunrisers Hyderabad's Travis Head scored 50 runs off 18 balls with the help of 2 sixes and 9 fours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.