ठळक मुद्देरिसेप्शनच्या दिवशी सागरिकाने भरजरी लेहंग्यावर साजेसे असे दागिने आणि हलकासा मेकअप केला होताया पार्टीला बॉलिवुड आणि क्रिकेट आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक हस्थी उपस्थित होत्या.लग्न साधेपणाने करून त्यांनी रिसेप्शन मात्र धडाक्यात आणि जोरदार केलं.
मुंबई : क्रिकेटर झहिर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं असलं तरीही त्यांची पार्टी मात्र भारीच ग्रण्ड ठरली आहे. कॉकटेल पार्टीपासून ते रिसेप्शनपर्यंत सारं काही अगदी थाटात पार पडलं आहे. लग्नानिमित्त क्रिकेट, मनोरंजन आणि बॉलिवूड विश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. २३ नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकेलेले सागरिका आणि झहिर यांनी २६ नोव्हेंबरच्या रात्री आपल्या मित्र मंडळींसाठी कॉकटेल पार्टीचं आयोजन केलं तर २७ नोव्हेंबर रोजी कुलाब्याच्या ताज पॅलेसमध्ये रिसेप्शन पार पाडला.
आणखी वाचा - झहीरसोबत विवाहबंधनात अडकली सागरिका घाटगे,समोर आले लग्नाचे नवीन फोटो
चक दे इंडियामधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सागरिकाने अनेक चित्रपटात काम केलंय. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत तिनं आपली ओळख निर्माण केलीय. आता हादसा नावाचाही तिचा एक चित्रपट येऊ घातलाय. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच ती लग्नाच्या बेडीत अडकली.
माजी क्रिकेटर झहीर खानसोबत वर्षभर डेट करून अखेर ते २३ तारखेला लग्नाच्या बंधनात अडकले. आशिष नेहरा आणि अंजना शर्मा या दोघांच्या उपस्थितीत त्यांचं रजिस्टर लग्न पार पडलं. पण त्यानंतर या आनंदाच्या बातमीसाठी आपल्या प्रियजनांना पार्टीतर द्यायलाच हवी. त्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी कॉकटेल पार्टीचं आयोजन केलं आणि २७ नोव्हेंबरला ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.
आणखी काही - या कारणामुळे जहीर खान बनला आहे सागरिका घाटगेच्या आईचा लाडका
या दोन्ही कार्यक्रमांना अनेक दिग्गजांनी उपस्थिती दाखवली होती. लग्न जरी अगदी साध्या पद्धतीने केलं असलं तरीही या जोडप्याने रिसेप्शन आणि पार्टी मात्र अगदी दणक्यात केली असल्याचीच चर्चा सध्या बॉलिवूड विश्वात रंगली आहे. अनेकांनी या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहून इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
युवराज सिंग, हाझेल कीच, विद्या मालवदे, आशिष चौधरी आदींनी कॉकटेल पार्टीमध्ये आपली उपस्थिती दाखवली तर रिसेप्शनमध्ये सुष्मिता सेन, बिना कक यांच्यासोबतच बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेकांनी हजेरी लावली होती.
रिसेप्शनच्या दिवशी सागरिकाने आयव्होरी आणि सब्यासाचीने डिझाईन केलेला लेहंगा परिधान केला होता. या भरजरी लेहंग्यावर साजेसे असे दागिने आणि हलकासा मेकअप केला होता, ज्यामुळे नववधूचं तेज सागरिकाच्या चेहऱ्यावर उठून दिसत होतं. झहिर खाननेही निळ्या रंगाचा बंदगळा कुर्ता घातला होता. यामध्ये हे दोन्ही जोडपे अगदी शोभून दिसत होते.
Web Title: Zaheer Khan and Sagarika Ghatge's reception party photos
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.