अबब! ५ वर्षांत रेल्वे अपघातात 18,423 जणांचा मृत्यू तर 18,874 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 07:03 PM2018-10-22T19:03:47+5:302018-10-22T19:04:13+5:30
दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी लोकलमधून पडून, रेल्वे पटरी क्रॉस करताना मृत्युमुखी पडतात. 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत मुंबईत रेल्वे पटरीवरील अपघातात 18,423 लोकांनी आपला जीव गमावले आहे अशी माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे.
मुंबई - अमृतसरमध्ये रावण दहन रेल्वे पटरीवर उभे राहून पाहणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवलं. या भीषण अपघात 61 लोकांच्या मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मुंबईची लाइफ लाइन असलेल्या रेल्वे लोकलमधून दररोज एक कोटीपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. या लोकल ट्रेनमध्ये बरीच गर्दी पाहायला मिळते. धावपळीच्या जगात या गर्दीमुळे प्रवाशांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दरवाजावर लटकून तर कधी उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी लोकलमधून पडून, रेल्वे पटरी क्रॉस करताना मृत्युमुखी पडतात. 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत मुंबईत रेल्वे पटरीवरील अपघातात 18,423 लोकांनी आपला जीव गमावले आहे अशी माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलीस यांच्याकडे 2013 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे पटरी क्रॉस करताना किती लोकांच्या मृत्यू आणि जखमी झाले आहे याची माहिती मागितली होती. या संदर्भात मुंबई रेल्वे पोलिसांचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती पुरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उपनगरी रेल्वे पटरीवर रेल्वे लोकलमधून पडून किंवा पटरी क्रॉस करताना 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत एकूण 18423 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच 18847 लोक जखमी झाले आहेत.
वर्षानुसार किती मृत्यू आणि लोक जखमी :-
2013 - एकूण 3506 लोकांच्या मृत्यू 3318 जखमी
2014 - एकूण 3423 लोकांच्या मृत्यू 3299 जखमी
2015 - एकूण 3304 लोकांच्या मृत्यू 3349 जखमी
2016 - एकूण 3202 लोकांच्या मृत्यू 3363 जखमी
2017 मध्ये एकूण 3014 लोकांच्या मृत्यू 3345 जखमी
2018 ऑगस्टपर्यंत एकूण 1974 लोकांच्या मृत्यू 2173 जखमी
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजू सुरक्षा भिंत बांधण्याच्या आदेश दिले आहे. परंतु रेल्वे प्रशासने याकडे लक्ष दिलेले नाही. अमृतसरसारख्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहात का असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांना विचारला आहे.