बिल्डर सुपारीवालाला पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:31 PM2018-08-23T15:31:39+5:302018-08-23T15:35:10+5:30
परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये काल लागलेल्या आगीत चार जणांचा नाहक मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीचा बिल्डर अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला याला न्यायालयाकडून २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई - परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये काल लागलेल्या आगीत चार जणांचा नाहक मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीचा बिल्डर अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला याला न्यायालयाकडून २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिर्यादी विनोद मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिल्डर सुपारीवाला याला अटक करण्यात आली होती.क्रिस्टल इमारतीमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र, ही यंत्रणा बंद असल्यामुळे आग आणखी भडकल्याचेही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. यामुळे अग्निशमन दलाकडून दाखल तक्रारीवरून अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला या बिल्डरविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुपारीवाला याला ताब्यात घेतलं होतं.
मुंबईतील क्रिस्टल टॉवर आगप्रकरणी बिल्डर सुपारीवाला अटकेत