शार्क माशांच्या कल्ल्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 10:44 PM2018-09-03T22:44:54+5:302018-09-04T15:59:54+5:30
या कारवाईत मुंबई, वसईतील उत्तन येथून आठ टन शार्क माशाचे कल्ले जप्त करण्यात आले आहेत
मुंबई - वीस हजार शार्क माशांना बेकायदेशीरीत्या पकडून त्यांच्या कल्ल्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आल्याने, एकच खळबळ माजली आहे. यापकरणी चौघांना अटक केली असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत मुंबई, वसईतील उत्तन येथून आठ टन शार्क माशाचे कल्ले जप्त करण्यात आले आहेत. ही टोळी चीन, जपानमध्ये कल्ल्यांची विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात या कल्ल्यांना प्रती टन तीस ते चाळीस कोटी रुपये भाव आहे. यामुळे याप्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचा संशय महसूल गुप्तचर संचालनालयाला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.