कुलाबा ते कुर्ला व्हाया मरिन लाइन्स-दादर-ठाणे; 'अशा' सापडल्या बेपत्ता विद्यार्थिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 05:54 PM2018-09-01T17:54:41+5:302018-09-01T20:36:43+5:30
शाळेतून सुटल्यानंतर मारिन लाइन्स ते हँगिंग गार्डन आणि नंतर दादर ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास केल्याचे तपासात उघड झाले आहे. पुन्हा आज या मुली कुर्ला रेल्वे स्थानकावर पोलिसांना शोध घेत असताना सापडल्या आहे.
मुंबई - कुलाब्यातून काल शाळा सुटल्यानंतर घरी न परतलेल्या पाच शाळकरी मुली कुलाबा पोलिसांना कुर्ला रेल्वे स्थानकावर सापडल्या आहे. एका कफ परेडच्या पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या नातेवाईकाला भटकत असलेल्या मुली दिसल्या होत्या आणि त्याच आधारावर पोलिसांनी या हरवलेल्या पाच मुलींना शोधून काढले आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली. कालपासून गायब असलेल्या या मुलींनी टॅक्सी आणि रेल्वेने प्रवास करत शाळेतून सुटल्यानंतर मारिन लाइन्स ते हँगिंग गार्डन आणि नंतर दादर ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास केल्याचे तपासात उघड झाले आहे. पुन्हा आज या मुली कुर्ला रेल्वे स्थानकावर पोलिसांना शोध घेत असताना सापडल्या आहे. पाच मुलींपैकी एक मुलगी हि आपल्या नातेवाईकांकडे मुंबईत गेली असून लवकरच तिचा ताबा घेऊन तिच्या पालकांकडे सुपूर्द करू अशी माहिती सहाय्य्क पोलीस आयुक्त सुभाष खानविलकर यांनी दिली. मात्र, या पाच मुली रात्रभर कुठे होत्या असा प्रश्न खतखतत होता. त्यावर पोलिसांनी या मुलींनी स्वतःजवळ असलेल्या पैश्यांनी बाहेर काहीतरी खाऊन रात्र माहीम चर्च बाहेर असलेल्या बाकावर बसून काढली. तर पाच जणींपैकी एक मुलगी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका मित्रासोबत गेली. या मित्राचा पोलिसांना ठावठिकाणा लागलेला आहे.
आठवी इयत्तेत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी काल दुपारपासून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. कुलाबा पोलिसांकडून बेपत्ता मुलींचा शोध सुरु केला. फोर्ट कॉन्व्हेट स्कूल कुलाबा येथे या ५ ही विद्यार्थिनी शिकतात. काल या विद्यार्थिनींचा ओपन डे म्हणजे परीक्षेचा निकाल होता. या विद्यार्थिनींना परिक्षेत कमी गुण मिळाले होते तर काहीजणी काही विषयात नापास झाल्याने त्या नाराज होत्या. ओपन डे झाल्यानंतर पालक घरी गेले. मात्र, अगोदरच या मुलींनी आपण पास झाल्याची खोटी माहिती पालकांना दिली होती. त्यामुळे शाळा सुटल्यानांतर भीतीपोटी दुपारी २. ३० वाजताच्या सुमारास या मुली घरी न जात मरीन ड्राईव्ह येथे बसल्या होत्या. त्यानंतर त्या हँगिंग गार्डन, दादर, ठाणे आणि नंतर पुन्हा दादर अशा भटकत होत्या. मात्र, शाळेतून सुटलेल्या मुली घरी न परतल्याने धास्तावलेल्या पालकांनी कुलाबा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. पोलिसांनी देखील त्यांची पथके इतरत्र पाठवून हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान कप परेडच्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून या मुली कुर्ला रेल्वे स्थानकात सापडल्या. या मुलींकडे मोबाइल नसल्याने या मुलींचा शोध घेणं पोलिसांना खूप अवघड होत. मात्र, या पाच मुलींना फिरताना कफपरेडच्या एका कॉन्स्टेबलने त्याच्या नातेवाईकासोबत असताना पाहिले होते आणि याचमुळे पोलिसांना महत्वाचा धागा सापडला. त्यामुळे पोलिसांना हरवलेल्या मुली कुर्ला रेल्वे स्थानकावर बसल्या असताना आज सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास सापडल्या.
@MumbaiPolice कुलाब्यातून हरवलेल्या पाच शाळकरी मुली कुर्ला रेल्वे स्थानकावर पोलिसांना सापडल्या, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली माहिती
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 1, 2018
कुलाब्यात पाच शाळकरी मुली बेपत्ता, कमी गुण मिळाल्यानं होत्या नाराज; पालक चिंतेत