पोलीस महासंचालक म्हणून मी आणि आमची टीम या ठिकाणी जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 04:37 PM2019-05-01T16:37:46+5:302019-05-01T16:40:11+5:30
पोलीस आणि जवानांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे.
मुंबई - गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी काल रात्री महामार्गाच्या कामासाठी आणलेली 36 वाहनं जाळली. तसेच आज दुपारच्या सुमारास सीआरपीएफच्या क्युआरटी जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्या भूसुरुंग स्फोटात उडवल्या. यामध्ये १५ जवाना शहीद झाले आहेत तर १ वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर पोलीस आणि जवानांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषदेत सर्व माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल देताना म्हणाले केद्रांतून सर्वप्रकारची मदत मिळत आहे. पोलीस संचालक म्हणून मी आणि आमची टीम या ठिकाणी जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी दिली.
जंगलाचा अभ्यास करून मग योग्य ती कारवाई करू. आमची पथकं घटनास्थळी पोहोचतील आणि त्यानंतर माहिती घेऊन पुढची पावलं उचलली जातील. तसेच पुढे त्यांनी सांगितलं की, या हल्ल्याचा थेट निवडणुकांशी संबंध लावता येणार नाही. अडीच तासात जेवढी माहिती आमच्यापर्यंत आली ती आपल्यासमोर मांडत आहे. आम्ही कायमच दक्ष होतो. आमच्याकडे निवडणूक काळात अशा घटना घडण्याची शक्यता असल्याची माहिती होती, मात्र तसे काही झाले नाही. ही घटना दुर्दैवी आहे, अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही दक्ष राहू. पूर्ण ताकदीनिशी आम्ही नक्षलवाद्यांचा बिमोड करू. जवान या भागातून जात असताना सर्व तयारी केली होती. त्यांच्याविरोधात आम्ही कडक कारवाई करणार आहोत. १५ जवान शहीद झाले आणि एक वाहन चालकाचा मृत्यू झाला. खुराडा पोलीस ठाण्याकडे जात असताना भूसुरुंगाचा स्फोट झाला. कुरखेडा पोलिसांचे हे पथक होते. नक्षलवाद्यांचा भ्याड हल्लाच म्हणावा लागेल असे पोलीस महासंचालक म्हणाले. आज १२. ३० वाजता क्विक अॅक्शन टीम (क्यूआरटी) वाहनातून प्रवास करत असताना नक्षल्यांनी हा भ्याड हल्ला केला अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई - गडचिरोली नक्षली हल्लाप्रकरण : पोलीस संचालक म्हणून मी आणि आमची टीम या ठिकाणी जाणार - पोलीस महासंचालक https://t.co/fUWIufFuiq
— Lokmat (@MiLOKMAT) May 1, 2019