डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : ३ डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:24 PM2019-05-29T17:24:03+5:302019-05-29T17:28:04+5:30
अटक ३ डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही अटक डॉक्टरांनान्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल सायंकाळी डॉ. भक्ती मेहरे आणि रात्री डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांनाअटक करण्यात आली होती. त्यानंतर आज डॉ. अंकिता खंडेलवालला अटक करण्यात आली. आज या तिन्ही आरोपींना सत्र न्यायालयात विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने अटक ३ डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी 22 मेला गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक नुकतीच घटना घडली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तिन्ही डॉक्टरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेनंतर नायर रुग्णालयाबाहेर आंदोलनं देखील करण्यात आली होती आणि सुरु आहेत. पायलचे फेब्रुवारी २०१६ साली सलमान तडवी यांच्या लग्न झाले. सलमान सध्या कूपर रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. ते मूळचे भुसावळच्या रावेर येथील आहेत. पायलने यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर म्हणून काम केले आहे. तीन महिला डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही अटक डॉक्टरांना न्यायालयाने ३१ मेपर्यंत सुनावली पोलीस कोठडी https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2019
Payal Tadvi alleged suicide case: All three accused sent to police custody till 31st May. pic.twitter.com/3DJZ6FsVb1
— ANI (@ANI) May 29, 2019