खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 02:28 PM2024-04-28T14:28:27+5:302024-04-28T14:35:31+5:30

उन्नावमध्ये लग्नात बाईक न मिळाल्याने पती संतापला. पत्नीला भयंकर शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

husband strangled his wife to death for not getting motorcycle at wedding in unnao | खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये लग्नात बाईक न मिळाल्याने पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. हे लग्न फक्त 8 दिवसांपूर्वीच झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उन्नावमधील गंगाघाट कोतवाली भागातील एखलाक नगरमधील हे प्रकरण आहे, जिथे रविवारी सकाळी एका नवविवाहित महिलेची घरात गळा दाबून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर येथील रहिवासी जुम्मन अन्सारी यांनी 21 एप्रिल रोजी त्यांची मुलगी चांदनी हिचा विवाह गंगाघाट कोतवाली भागातील एखलाक नगर येथील नदीमसोबत केला होता.

जुम्मन अन्सारी यांनी आपल्या क्षमतेनुसार लग्नात पैसे खर्च केले. लग्नानंतर बाईक न मिळाल्याने पती आणि सासरच्या लोकांनी मुलीचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे. त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्याने पती नदीमने लग्नाच्या अवघ्या 8 दिवसांतच पत्नी चांदनीची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

चांदनीची बहिण शायना हिने सांगितलं की, नदीमसोबत 8 दिवसांपूर्वी 21 एप्रिल रोजी लग्न झालं होतं. हे लोक लग्नात बाईकची मागणी करत होते. काल रात्री मी माझ्या बहिणीशी फोनवर तासभर बोलले आणि सकाळी तिच्या सासूबाईंनी घरी येण्यासाठी फोन केला. आम्ही तिथे गेलो तेव्हा बहिणीचा मृत्यू झाला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: husband strangled his wife to death for not getting motorcycle at wedding in unnao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.