ट्रंकभर पुराव्यांसह कन्हैय्या आणि १० जणांविरोधात १२०० पानांचे आरोपपत्र; उद्यापासून सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 06:22 PM2019-01-14T18:22:43+5:302019-01-14T18:25:00+5:30
कन्हैयासह सय्यद उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे.
नवी दिल्ली - जेएनयू येथे केलेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने आज पतियाळा हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले. जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारसह १० जणांवर २०१६ साली दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या खटल्यांतर्गत आरोप करण्यात आले आहेत. तब्बल १२०० पानांच्या या आरोपपत्रावर उद्यापासून सुनावणी होणार आहे.'हम लेके रहेंगे आजादी..., संगबाजी वाली आजादी..., भारत तेरे टुकड़े होंगे..., कश्मीर की आजीदी तक जंग रहेगी..., भारक के मुल्क को एक झटका और दो..., भारत को एक रगड़ा और दो..., तुम कितने मकबूल मरोगे..., इंडियन आर्मी को दो रगड़ा..' आदी घोषणा आरोपपत्रात नमूद करण्यात आल्या आहेत.
३० वर्षे तपास आणि चौकशी केल्यानंतर पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले. तसेच एक ट्रंक भरून पुरावे कोर्टात सादर केले आहेत. आरोपपत्रात कन्हैया आणि अन्य आरोपींनी केलेल्या कथित १२ घोषणांचाही समावेश करण्यात आला आहे. कन्हैयासह सय्यद उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे. संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ला करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यवर आहे. या प्रकरणातील आरोपींची साक्ष सीआरपीसीच्या त्या कलमांतर्गत नोंद करण्यात आली आहे. साक्ष पलटल्यास त्यांना शिक्षा होऊ शकते. या व्यतिरिक्त फॉरेन्सिक आणि फेसबुक डेटाच्या माध्यमातूनही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. भा. दं. वि. कलम १२४अ, ३२३, ४६५, १४३, १४९, १४७, १२० ब या कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
The chargesheet has been filed under IPC section 124A (sedition), 323 (voluntarily causing hurt), 465 (forgery), 471 (using as genuine, forged document), 143 (punishment for unlawful assembly), 149 (unlawful assembly with common object), 147(rioting), & 120B (criminal conspiracy) https://t.co/WFxRIb3Sk7
— ANI (@ANI) January 14, 2019