मनोजचा मोबाइल उलगडणार हत्येचे गूढ; पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज
By पूनम अपराज | Published: October 12, 2018 09:14 PM2018-10-12T21:14:07+5:302018-10-12T23:29:16+5:30
मनोजकुमारची आई कलावती (वय ६०) यांनी मनोजला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फोन आला होता. त्याच व्यक्तीने हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुंबई - दादर फुलमार्केटसारख्या गजबजलेल्या परिसरात आज सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास मनोजकुमार मौर्य (वय ३५) या इसमाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा अज्ञात आरोपींविरोधात दाखल असून आरोपीचा शोध पोलीस मृत मनोजकुमारच्या मोबाइलच्या आधारे घेत आहेत. त्यामुळे गोळी झाडणारे ते अज्ञात हत्येखोर कोण ? याचा छडा मोबाइलद्वारे लागणार आहे. मनोजकुमारची आई कलावती (वय ६०) यांनी मनोजला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फोन आला होता. त्याच व्यक्तीने हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कलावती ही आई, पोन्नूरम हे वडील, सात वर्षाच्या सार्थक हा मुलगा व भावनादेवी ही पत्नी असा मोर्या यांच्या पश्चात परिवार आहे. ते दादर पश्चिम येथील फुल मार्केटशेजारीच असलेल्या श्री साईसिद्धी इमारतीत राहते. दादर फूल मार्केटसमोरील म्हात्रे हाऊस या इमारतीच्या समोरील रस्त्यावर फुले व वजन काटा पुरवणाऱ्या मनोजकुमार मौर्या यांची अनोळखी मारेकऱ्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी दादर पोलिसांनी हत्या व हत्यार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. परळहून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्यावर गोळ्या झाडून दोघेही फरार झाले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनोजला व्यापाऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी परळच्या के. ई. एम. रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर दादर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. तपासासाठी घटनास्थळाचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. मात्र, मनोजकुमारच्या आईने सकाळी फोन केलेल्या व्यक्तीने मनोजला बोलाविल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा त्या फोन करणाऱ्या व्यक्तीवर संशय असून पोलीस मोबाइलच्या सविस्तर माहितीतून या खुनाचा आरोपी शोधणार आहेत.