२३ व्या मजल्यावरून उडी मारून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 02:18 PM2018-10-27T14:18:38+5:302018-10-27T21:52:21+5:30

ताडदेव पोलीस तपास करत आहेत. मुलीला शवविच्छेदानासाठी नायर रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी दाखल पूर्व मयत घोषित केले. याबाबत ताडदेव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास करत आहेत. 

A minor girl committed suicide by jumping from the window | २३ व्या मजल्यावरून उडी मारून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

२३ व्या मजल्यावरून उडी मारून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

Next

मुंबई - शुक्रवारी मध्यरात्री  2:30 वा. ते 3:00 वाजताच्या दरम्यान प्रियंका आमरिष कोठारी (वय 16 ) या अल्पवयीन मुलीने राहत्या घराच्या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना ताडदेव येथील इम्पिरियल टॉवरमध्ये घडली आहे. या टॉवरमध्ये २३ व्या मजल्यावर रूम नं. 2308 मध्ये कोठारी कुटुंबीय राहतात. काल मध्यरात्री प्रियंकाने याच रूमच्या खिडकीतून खाली उडी मारून जीवन संपवलं. यामागे नेमकं काय कारण याचा ताडदेव पोलीस तपास करत आहेत. मुलीला नायर रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी दाखल पूर्व मयत घोषित केले. याबाबत ताडदेव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास करत आहेत. 

मृत मुलगी हिल स्प्रिंग इंटरनॅशनल शाळेत शिकत होती. मृत प्रियंकाचे वडिलांचा ज्वेलरीचा व्यवसाय असून काल ते नवी दिल्लीत कामानिमित्त गेले होते. प्रियंकाला एका लहान ६ वर्षाचा भाऊ आहे. रात्री उशिरा प्रियंका आपल्या मित्र - मैत्रिणीसोबत पार्टीला जाऊन घरी आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रियंकाने राहत्या घराच्या खिडकीतून खाली उडी मारली. त्यावेळी ती जखमी अवस्थेत नवव्या मजल्यावरील लॉनमध्ये पडली होती. याबाबत टॉवरच्या सुरक्षा रक्षकाला माहिती मिळताच त्याने पोलिसांना बोलावले. घटनास्थळी अथवा घरात सुसाईट नोट सापडली नसून नेमकं या आत्महत्येमागील कारण पोलीस शोधत असल्याची माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

Web Title: A minor girl committed suicide by jumping from the window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.